LIVE BLOG | मावळचे माजी खासदार गजानन बाबर भाजपमधून पुन्हा शिवसेनेत

Background
1. अक्षय कुमारनं घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीवर राहुल गांधींच खोचक ट्वीट, तर मोदींना कुर्ते आणि मिठाई पाठवणाऱ्या ममता बॅनर्जींचाही पलटवार
2. मनाजोगा निर्णय न दिल्यानं सरन्यायाधीशांना अडचणीत आणण्यासाठी लैंगिक शोषणाचे आरोप, वकील उत्सव बैन्सकडून पुरावे सादर, तपास यंत्रणांना चौकशीसाठी समन्स
3.एन. डी. तिवारींचा मुलगा रोहितची पत्नीनंच हत्या केल्याचं उघड, वैवाहिक सुख मिळत नसल्यानं रोहितचा गळा घोटल्याची अपूर्वाकडून कबुली
4. मोदींच्या गावातचं पुरेसे शौचालय नसल्याचा राज ठाकरेंचा दावा, मुंबईतल्या सभेत दाखवला व्हीडिओ, तर 27 तारखेला भाजप व्हीडिओ दाखवून मनसेची पोलखोल करणार
5. लोकल अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरेचा राजकीय स्वार्थासाठी वापर, राज ठाकरेंचा खासदार किरीट सोमय्यांवर घणाघात,
6. चौथ्या टप्प्यातल्या प्रचार शिगेला, मतदारांच्या प्रत्यक्षात गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांचा भर, धारावीत प्रचारासाठी रॅप साँग गाणाऱ्या गली बॉयची चर्चा























