LIVE BLOG | काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

Background
1. उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरुन घसरले, 20हून अधिक प्रवासी जखमी, अनेक गाड्याचा खोळंबा
2. हेमंत करकरेंचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञाचा थेट माफी मागण्यास नकार, चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर सारवासारव, भाजपकडूनही कारवाई नाही
3. भाजपविरोधात सभा घेण्यासाठी राष्ट्रवादीनं राजना विधानसभेच्या 25 जागांचं आमिष ,खासदार संजय काकडेंचा आरोप, तर सलग सहाव्या सभेत मनसेअध्यक्षांचा मोदींवर हल्लाबोल
4. महायुतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात तर गिरीश बापटांसाठी मुख्यमंत्र्यांची पुण्यात सभा तर पवार बारामतीत
5. तब्बल 24 वर्षांचं वैर विसरून मुलायम आणि मायावती एकाच व्यासपीठावर , मोदी-शाहांचा वारू रोखण्यासाठी बाबा, बुआ आणि बबुआची युती
6. अटीतटीच्या सामन्यात बँगलोरचा कोलकत्यावर 10 धावांनी विजय, अखेरच्या षटकात कोलकत्याचा पराभव























