LIVE BLOG : दीपाली सय्यद यांचा सुजय विखेंना पाठिंबा

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. नवीन आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर, गॅस महागला, तर टाटा आणि महिंद्रा गाड्यांच्या किंमतीतही वाढ
2. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, वर्ध्यात पहिली जाहीर सभा, भाजपसह मित्रपक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार
3. तिसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावाधाव, सोमय्यांच्या उमेदवारीवर आज निर्णय होण्याची शक्यता, तर पुण्यात उमेदवार निश्चितीच्या आधीच काँग्रेसचा प्रचार सुरु
4. जेट एअरवेजचे कर्मचारी आजपासून सामूहिक सुट्टीवर, थकीत पगार न दिल्यानं कर्मचाऱ्यांचा पवित्रा, अनेक उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता
5. इस्रो 28 देशांचे उपग्रह अंतराळात सोडणार , श्रीरहरिकोटाच्या सतिश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा
6. चेन्नई सुपर किंग्जची आयपीएलमध्ये विजयाची हॅटट्रिक, तिसऱ्या साखळी सामन्यात राजस्थानचा आठ धावांनी पराभव, गोलंदाजांचा टिच्चून मारा


















