LIVE BLOG | धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Background
1. विधानसभेच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासनांची खैरात, पाच दिवसांच्या आठवड्यासह निवृत्ती वयाबाबत लवकरच निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
2. चंद्रकांत पाटील यांचा फोटो असलेलं भाजपचं ओळखपत्र दाखवल्यास टोल फ्री प्रवास, खुद्द भाजप आमदार सुरेश हाळवणकरांकडून पक्षाच्या फुकटेगिरीचा पर्दाफाश
3. अंडी आणि कोंबड्यांना आयुर्वेदिक घोषित करा, नंदुरबारमधल्या आदिवासी पाड्याचा किस्सा सांगत संजय राऊतांची राज्यसभेत अजब मागणी
4. एनआयए विधेयकाच्या चर्चेदरम्यान अमित शाह आणि ओवेसींमध्ये जोरदार खडाजंगी, गृहमंत्री विरोधकांना घाबरवत असल्याचा आरोप, तर शाहांचाही ओवेसींवर पलटवार
5. सेवानिवृत्त झालेल्या वयोवृद्ध मंडळींनी शहराबाहेर राहायला काय हरकत, ट्राफिकच्या समस्येवरुन मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा मुंबईकरांना सल्ला
6. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये हजारो भाविक दाखल, तर शिर्डीत साईबाबा मंदिरात मोठा उत्साह, चंद्रग्रहणामुळे आज रात्री साईंचं मंदिर बंद राहणार
























