LIVE BLOG : राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले, विखेंसोबत चंद्रकांत पाटील देखील उपस्थित
LIVE
Background
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा, स्वत: मुख्यमंत्र्यांचं ट्वीट
2. बिश्केक परिषदेदरम्यान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात चर्चा, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा, भारताकडून अद्याप दुजोरा नाही
3. ममता बॅनर्जींनी बिनशर्त माफी मागावी, संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांची मागणी, कोलकात्यात झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातल्या डॉक्टरांचा संपात सहभाग
4. मालाड,अंधेरी आणि गोवंडीत अंगावर झाड कोसळल्यानं तिघांचा मृत्यू, तर ठाण्यात रस्ता खचून 3 गाड्या काही फूट खाली
5. तिसऱ्या अपत्यासाठी 50 हजार तर चौथ्या आपत्यासाठी 1 लाखांची मदत, लोकसंख्या घटत असलेल्या माहेश्वरी समाजाचं चेतना लहर अभियान
6. उन्हाळी सुट्टीत अंबाबाई चरणी कोट्यवधीचं दान, दानपेटीत 1 कोटी 7 लाख रुपये जमा, अल्पावधीत जमा झालेलं आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी