LIVE BLOG : सीएसटीएम स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला, मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये, जखमींना 50 हजार रुपयांची मदत, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही, चीनच्या आडकाठीमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने प्रस्ताव फेटाळला
2. भारतीय हद्दीजवळून दोन पाकिस्तानी विमानांची उड्डाणं, वायु दल आणि रडार यंत्रणा हायअलर्टवर, एएनआयच्या हवाल्यानं वृत्त
3. लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार
4. भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये, मित्रपक्ष शिवसेनेचा भाजपला सल्ला
5. मुलंच नाही तर नातवंडही पळवू, सुजय विखेंना भाजप प्रवेशानंतर गिरीश महाजनांचा ‘माझा’च्या तोंडी परीक्षेत इशारा
6. पक्षाने जबाबदारी द्यावी, माझ्याकडे स्किल आहे, बारामती जिंकून दाखवेन, ‘माझा’च्या तोंडी परीक्षेत गिरीश महाजनांचं वक्तव्य























