LIVE BLOG : सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
LIVE
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात तर 23 मे रोजी निकाल, 7 टप्प्यांत निवडणुका, देशभरात आचारसंहिता लागू
2. महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेचं मतदान, तिकीट वाटपासाठी आठवडाभराचा अवधी, पुढच्या सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात
3. या घडीला निवडणुका झाल्यास एनडीएला बहुमत नाही, मात्र एनडीएचलाच सर्वाधिक जागा, एअर स्ट्राईकनंतर एबीपी न्यूज आणि सीव्होटर्सचा सर्व्हे
4. निवडणुका जाहीर होऊनही युती आणि आघाडीतले मित्रपक्ष टांगणीवर, आरपीआय, रासपची जागा अद्यापही अनिश्चित, शेट्टी-आंबेडकरांबाबतही संभ्रम
5. गल्लीतल्या नेत्यांकडे लक्ष देऊ नका, राज ठाकरेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका, त्यांची हल्ली स्क्रिप्ट बारामतीतून येत असल्याचाही टोला
6. मोहाली वन डेत ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर चार विकेट्सनी सनसनाटी विजय, अॅस्टन टर्नरची मॅचविनिंग खेळी, ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी