LIVE BLOG : महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल : नरेंद्र मोदी

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात, गोंदियात संध्याकाळी जाहीर सभा, तर उद्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचाही महाराष्ट्र दौरा
2. पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबियांची चिंता करु नये, कोल्हापुरातील सभेत शरद पवाराचं प्रत्युत्तर तर पुतणे अजित पवारांवर स्तुतीसुमनं
3. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यासाठी सुरुवात, आज सुप्रिया सुळे, इम्तियाज जलील, मोहन जोशींसह अनेक दिग्गज नेते अर्ज दाखल करणार
4. निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं टेम्पल रन, वसईतील गुरुद्वारामध्ये माथा टेकवला, तर बिशप हाऊस आणि वसई किल्ल्यालाही भेट
5. यंदाच्या मान्सून संदर्भात स्कायमेटचा दुसरा अंदाज आज जाहीर होणार, अंदाजाकडे शेतकऱ्यांसह सामान्यांचंही लक्ष
6. राजस्थान रॉयल्सकडून बंगलोरचा सात विकेटसनी धुव्वा, जोश बटलरची 59 धावांची खेळी, आयपीएलमध्ये बंगलोरचा सलग चौथा पराभव























