IPL 2024
क्रिकेट
निवडणूक
अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
विजय चौधरीच्या लग्नाची बातमी त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची आहेच, पण त्यांच्यासाठी आनंदाची दुसरी बाब म्हणजे त्यांचा लाडका पैलवान लग्नानंतरही कुस्ती खेळायची म्हणतोय.
विजय हा मूळचा चाळीसगावच्या सायंगावचा पैलवान. त्याचे वडील नथ्थू भिका चौधरी हे पंचक्रोशीतले नावाजलेले पैलवान. विजयनं कुस्तीचा वारसा आपल्या वडीलांकडूनच घेतला.
विजय चौधरीनं तीनदा महाराष्ट्र केसरी आणि मग हिंदकेसरी झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असं घरच्यांना बजावून सांगितलं होतं.
‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाला की, कुस्तीचा आखाडा आणि संसार या दोन अलग अलग गोष्टी आहेत. पण माझी पत्नी कोमल स्वत:ही खेळाडू असल्यानं मला समजून घेऊ शकेल. त्यामुळं यापुढच्या काळातही मला कुस्ती खेळता येईल.
विजय आणि कोमलचं सिंहासनाच्या रथातून तिथं आगमन झालं आणि सनईचौघड्याला फटाक्यांच्या आतषबाजीचीही जोड लाभली. विजयची पत्नी कोमल ही व्यावसायिक प्रकाश भागवत यांची कन्या असून, तिनं एमबीएचं शिक्षण घेतलंय. पण ती मूळची जलतरणपटू आहे, हे विजयसाठी अभिमानाचं क्वालिफिकेशन आहे.
विजय आणि कोमलचं सिंहासनाच्या रथातून तिथं आगमन झालं आणि सनईचौघड्याला फटाक्यांच्या आतषबाजीचीही जोड लाभली.
विजय चौधरीला ट्रिपल महाराष्ट्र केसरी किताबांनी मोठी लोकप्रियता आणि पोलीस उपअधीक्षकाची मानाची नोकरीही मिळवून दिली. त्यामुळं विजयच्या लग्नासाठी अवघ्या महाराष्ट्रातून आजीमाजी पैलवान आणि त्याचे चाहतेही नाशिकच्या लग्नमंडपात दाखल झाले होते.
एक पैलवान म्हणून विजय आज बारा गावचं पाणी प्यायलाय. तसंच २०१४, २०१५ आणि २०१६ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरताना त्यानं गावोगावच्या पैलवानांना सायंगावचं पाणीही पाजलंय.
विजयची पत्नी कोमल ही व्यावसायिक प्रकाश भागवत यांची कन्या असून, तिनं एमबीएचं शिक्षण घेतलंय. पण ती मूळची जलतरणपटू आहे, हे विजयसाठी अभिमानाचं क्वालिफिकेशन आहे.
पण कोमलला पाहिलं आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा कलिजा खलास झाला. विजयची बहीण मनीषाताईनं पुढाकार घेऊन ही सोयरीक जुळवून आणली. आधी विजयच्या आईवडीलांनी कोमलला पसंत केलं होतं. मग विजयरावही कोमलला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडले.
पैलवान विजय चौधरीचा विवाह एमबीए गर्ल कोमल भागवतशी नाशिकच्या बालाजी लॉन्सवर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
Makar Sankranti 2026 Wishes : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Pandharpur: मकरसंक्रातीनिमित्त सुवासिनी वाण घेऊन पंढरपुरात, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तेजाने झळाळली! आजची खास क्षणचित्रे पाहाच..
Sonu Sood : सोनू सूदकडून गुजरातमधील गोशाळेला मोठी देणगी; वासराला जवळ घेत म्हणाला...
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
'लग्न टिकवण्यासाठी फक्त प्रेम...' अमृता खानविलकर सांगते संसाराची गुरूकिल्ली
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता