Yoga For Healthy Heart : योगाचे (Yoga) आपल्या शरीराला होणारे फायदे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. यामुळे मनाला शांती तर मिळतेच पण योगा केल्याने आपलं शरीर देखील फ्लेक्सिबल आणि तंदुरुस्त राहतं. तसेच, शरीराच्या बाहेरील अवयवांप्रमाणेच शरीराच्या आतल्या भागांसाठी देखील योगा फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला हृदयाचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी काही योगासनं सांगणार आहोत जी तुम्ही अगदी 30 मिनिटांत करू शकता. ही आसनं नेमकी कोणती या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


1. ताडासन 




सध्याच्या काळात हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ताडासन करू शकता. हे आसन करण्यासाठी फार सोपं आहे. तसेच, हे हृदयाच्या आरोग्याबरोबरच तुमच्या शरीरासाठीही फायदेशीर आहे. 


2. वीरभद्रासन




हृदयाचं स्वास्थ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही वीरभद्रासन हे आसन देखील करू शकता. हे आसन फार सोपं आहे. तसेच, हे आसन केल्याने शरीरातील संतुलन नियंत्रित राहते आणि तुमचं रक्ताभिसरण देखील चांगलं राहण्यास मदत होते. हे आसन केल्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होतो. आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते. 


3. उत्तनासन




तुमचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही उत्तनासन देखील करू शकता. हे आसन करताना जेव्हा तुम्ही शरीर पुढच्या बाजूच नेऊन खाली वाकवता तेव्हा रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. यामुळे हृदय निरोगी राहून योग्य कार्य करते. हे आसन केल्याने तुम्हाला जांघेत, गुडघ्यात आणि स्पाईनच्या मसल्सची फ्लेक्सिबिलिटी वाढते. 


4. भुजंगासन




हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही भुजंगासन देखील करू शकता.दररोज काही मिनिटांसाठी तुम्ही हे आसन केल्याने हृदय निरोगी राहते. तसेच, हे आसन केल्याने पोटाची चरबी देखीलकमी होते. आणि पचनसंस्था नियंत्रित राहते. 


5. प्राणायाम 




हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी प्राणायाम हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तुम्ही जर रोज काही मिनिटांसाठी अनुलोम-विलोम हे आसन केल्यास श्वासासंबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच, यामुळे हृदयाचं आरोग्य देखील निरोगी राहतं. अनुलोम-विलोम आसन केल्याने तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते आणि पचनसंस्था नियंत्रित राहते. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Heart Attack Prevention : अॅसिडिटी देखील आहे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण; जाणून घ्या कधी व्हावं सावध!