देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Shiv Sena MLA Disqualification Case : प्रतीक्षा संपणार! शिवसेना आमदार अपात्रतेचा आज महानिकाल, विधानसभा अध्यक्षांकडे देशाचे लक्ष
Shiv Sena MLA Disqualification Case : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज सुनावण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे आज निकाल जाहीर करतील. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निकाल येणे अपेक्षित आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते... वाचा सविस्तर
पंकजा मुंडेंना धक्का! वैद्यनाथ साखर कारखाना विक्रीस; 25 जानेवारीला होणार ई-लिलाव
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत असून, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. वाचा सविस्तर
Mumbai Rain : मुंबई, ठाण्यात पावसाची हजेरी! हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Mumbai Weather Forecast : मुंबईमध्ये सोमवारी रात्री अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबई पश्चिम उपनगरात रात्री पावसाला सुरूवात झाली, त्यासह ठाण्यातही मंगळवारी रात्री पाऊस झाला. मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत मुसळधार पाऊस झाला. IMD नुसार, मंगळवारी दुपारपासून मुंबईवर ढग होते. सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत पसरलं असून त्यामुळे पाऊस पडत आहे.... वाचा सविस्तर
Weather Update : अवकाळी पावसाचं संकट कायम! पुढील 48 तास पावसाची रिमझिम कायम; IMD चा अंदाज काय सांगतो?
IMD Weather Update Today : देशातील हवामानात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळाली आहे. दक्षिण भारतासह कोकणाला पावसानं झोडपलं. संपूर्ण उत्तर भारतात थंडी कायम आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूसह दक्षिण भारतातील काही भागात पाऊस थांबताना दिसत नाहीय. थंडी आणि धुक्याच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा जारी केला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील नागरिकांना थंडीच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळणार आहे. पुढील 48 तासात देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे... वाचा सविस्तर
सूचना सेठनं आपल्या पोटच्या मुलाला कसं संपवलं? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Karnatak Crime News: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात नाव कमावणारी कंपनीची सीईओ 39 वर्षीय सूचना सेठ (Suchana Seth) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आपल्या पोटच्या मुलाचीच हत्या करुन या निर्दयी आईनं मातृत्वाला काळीमा फासला आहे. चार वर्षांच्या मुलाची हत्या करून गोव्याहून बंगळुरूला परतत असताना कर्नाटकातील चित्रदुर्गाजवळ तिला अटक करण्यात आली. कर्नाटक पोलिसांनी कारमध्ये ठेवलेल्या बॅगेतून मुलाचा मृतदेहही जप्त केला आहे. पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत... वाचा सविस्तर
सरकारी प्रवक्ता ते पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान; फ्रान्सचे पहिले समलिंग पंतप्रधान गॅब्रिएल अटल आहेत तरी कोण?
Gabriel Attal Becomes France Youngest PM: फ्रान्स : फ्रान्सच्या (France) पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न (PM Elisabeth Borne) यांनी सोमवारी (8th January 2024) आपल्या पदाचा राजीनामा दिला. इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे पंतप्रधान एलिझाबेथ यांनी राजीनामा दिला. एलिझाबेथ बोर्न यांनी राजीनामा दिल्यानंतर 34 वर्षीय गॅब्रिएल अटल फ्रान्सच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यावर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपूर्वी मोठे फेरबदल केले आहेत. गॅब्रिएल हे फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत. 2022 मध्ये सर्वात तरुण मंत्री म्हणून शपथ घेणारे गॅब्रिएल आतापर्यंत शिक्षण विभागाची जबाबदारी सांभाळत होते. मंगळवारी त्यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेण्यात आला... वाचा सविस्तर
Ecuador Gunmen : 13 बंदुका, तोंडावर मास्क लावून थेट चॅनलच्या स्टुडिओत घुसले; अँकरला धमकावलं; इक्वाडोरमध्ये राष्ट्रीय आणीबाणी
Ecuador Gunmen : इक्वाडोरमध्ये (Ecuador) थेट प्रक्षेपणादरम्यान (LIVE TV) 13 बंदुकधारी व्यक्ती (Gunmen) घुसले आणि त्यांनी अँकरला धमकवायला सुरुवात झाली. लॅटीन अमेरिकन देश इक्वाडोरमध्ये ही मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. 13 बंदूकधारी व्यक्तींनी मंगळवारी 9 जानेवारीला थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण (LIVE TV) सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला केला. या 13 जणांवर दहशतवादाचा आरोप लावण्यात येणार असल्याची माहिती इक्वेडोर सरकारने माहिती दिली आहे... वाचा सविस्तर
10 January In History : भारत-पाकिस्तान ताश्कंद करार, मुंबईतील चर्चगेट स्टेशनची सुरुवात; आज इतिहासात...
10th January In History: आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 10 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 1965 च्या युद्धानंतर भारत-ताश्कंदमध्ये आजच्या दिवशी करार झाला. तर, सुरतेवर स्वारी करून छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगडाकडे प्रयाण आजच्या दिवशी झाले... वाचा सविस्तर
Horoscope Today 10 January 2024 : आजचा बुधवार खास! सर्व 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 10 January 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 10 जानेवारी 2024, बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांनी आज व्यवसायात खूप सावध राहावे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचे नियोजन करण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक संशोधन करा आणि त्यानंतरच तुमचे पैसे गुंतवावे. आज कर्क राशीच्या लोकांना कुटुंबाकडून काही चांगली बातमी मिळू शकते, यामुळे कुटुंबातही आनंद असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया... वाचा सविस्तर