Yoga Day 2022 : एक काळ असा होता जेव्हा पन्नाशीनंतर हृदयासंबंधित तक्रारी जाणवू लागायच्या. पण आज हृदयाचे विकार होण्यासाठी कोणतेही ठराविक वय लागत नाही. योगा संबंधितसुद्धा आपल्या मनात बरेच गैरसमज असतात जसे की, हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींनी योगा करू नये. अमुक एका वयानंतर योगा करू नये, तसेच कोणतीही व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी योगा करू नये असं बरेच संभ्रम आपल्या मनात येतात. माहितीचा अभाव असल्या कारणाने असे प्रश्न पडू लागतात. आज हाच गैरसमज या लेखाच्या माध्यमातून आम्ही दूर करणार आहोत.
'योग्यति योगासने, प्राणायाम, ध्यान' हे हृदयविकारास खूप उपयोगी आहे. नियमित योगासने प्राणायाम, ध्यान करण्याने हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि हृदयाचे रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे हृदयाची गती सुधारते. हृदयावरील ताण रक्तदाब आणि पर्यायाने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. योगसने श्वासावर लक्ष केंद्रित करतात. प्रत्येक आसनानंतर विश्राम करावा. परिणामी प्रत्येक आसनाचा श्वसनसंस्थेवर आणि ह्रदयावरही चांगला परिणाम होतो.
या संदर्भात (होमिएओपथिक फिजिशियन, योगा थेरपिस्ट) डॉ. सौ. अंजली बाळकृष्ण उमर्जिकर यांनी असे सांगितले आहे की, योगासने आणि श्वसनाचे व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक ताण तणाव कमी होतो. आनंदी आणि तणाव मुक्त राहिल्यने हृदयविकाराची शक्यताही कमी होते.
खालील आसने सुरूवातीला साधी आणि हळूहळू तसेच जास्त दम लागणार नाही याची काळजी घेत करावी.
1. मार्जारासन :
ह्या आसनाने हृदयाचे ठोके पूर्ववत होऊन नियमित, लयित व्हायला मदत होते.
2. भुजंगासन :
छातीला मागच्या बाजूने ताणल्याने छातीचा भाग मोकळा होतो आणि श्वास सरळ घ्यायला मदत होते. या आसनामुळे छाती आणि पाठ बळकट होते.
3. शवासन :
ह्या आसनाने मन आणि शरीराला विश्रांती मिळते आणि संपूर्ण शरीर स्वास्थ्याला आवश्यक असलेली, ऊर्जा मिळते. शरीर आणि श्वास यांच्यातिल सूक्ष्म एकत्रता घडून येते.
4. प्राणायाम :
प्राणायाम म्हणजे श्वसनाचे व्यायाम हे आपल्या मेंदूचे हृदयावरील नियंत्रण वाढविण्यास मदत करतात. नाडिशोधन प्राणायाम हे हृदयासाठी उपयोगी प्राणायाम आहे. प्राणायामाने रक्तभिसरण सुधारते. ऊर्जा शक्ती वाढते. प्राणायाम करताना श्वास 10-15 सेकेंद धरून ठेवावा आणि आळीपाळीने एक एक नाकपुड्यांनी सोडावा. यामध्ये प्रत्येकाने आपली क्षमता पाहून श्वास धरावा आणि सोडावा.
5. ध्यान : ध्यान धारणेने मनाची एकाग्रता वाढते आणि मन शांत होण्यास मदत होते. मानसिक ताण कमी होऊन हृदयावरचा ताण कमी होण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या :