World Biryani Day 2023 : गेल्या वर्षभरात भारतीयांनी 7.6 कोटी बिर्याणी ऑर्डर केल्या; Swiggy चा खुलासा
World Biryani Day 2023 : ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने स्पष्ट केले की, भारतीयांनी गेल्या वर्षभरात 7.6 कोटी बिर्याणी ऑर्डर केल्या आहेत.
![World Biryani Day 2023 : गेल्या वर्षभरात भारतीयांनी 7.6 कोटी बिर्याणी ऑर्डर केल्या; Swiggy चा खुलासा World Biryani Day 2023 India 7.6 Crore Biryani Orders Placed Last 12 Months Swiggy World Biryani Day 2023 : गेल्या वर्षभरात भारतीयांनी 7.6 कोटी बिर्याणी ऑर्डर केल्या; Swiggy चा खुलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/b2d2137f61e38045402d06ee90bdce7c1687942939951557_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
World Biryani Day 2023 : आज जगभरात जागतिक बिर्याणी दिन (World Biryani Day) साजरा केला जातोय. आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी भारतीय खाद्यपदार्थांची ती चव आणि विविधता आपल्याला क्वचितच मिळेल. विविध देशाच्या विविध भागांत एकापेक्षा एक चवीचे खाद्यपदार्थ आहेत, जे आवडीने खाल्लेही जातात. असे असले तरी, भारतीय आपल्या ताटात सध्या परदेशी पदार्थांचा समावेश करत असले तरी, आजही त्यांची जीभ फक्त देशी चवीकडेच वळत असल्याचं एका आकडेवारीतून स्पष्ट झालंय. भारतीय लोक खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच खवय्ये आहेत. आरोग्यासोबतच त्यांना चवीबाबतही तडजोड नको हवी असते. अशातच ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने (Swiggy) शुक्रवारी उघड केले की भारतीयांनी गेल्या 12 महिन्यांत 7.6 कोटी बिर्याणी ऑर्डर देण्यात आल्या होत्या असे सांगितले आहे. कंपनीचा दावा आहे की संपूर्ण देशभरातील ग्राहकांनी प्रत्येकी 219 ऑर्डर केल्या आहेत. या ऑर्डरमध्ये ग्राहकांनी चवदार "कोलकाता बिर्याणी" पासून सुगंधित "मलबार बिर्याणी", "हैदराबादी दम बिर्याणी" पर्यंत ऑर्डर केल्या होत्या.
8 टक्के वाढ झाल्याची माहिती
जेवण वितरण सेवा स्विगी (Swiggy) जानेवारी 2023 ते जून 2023 दरम्यान दिलेल्या ऑर्डरचा डेटा सादर केला आणि सांगितले की, 2022 च्या तुलनेत मागील साडेपाच महिन्यांत बिर्याणीच्या ऑर्डरमध्ये तब्बल 8.26 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या एका रेकॉर्डनुसार 7.6 कोटींहून अधिक बिर्याणी ऑर्डर्स पूर्ण झाल्या आहेत. या फूड डिलिव्हरी सेवेमध्ये 2.6 लाखांहून अधिक आस्थापना मेनूमध्ये बिर्याणी असल्याच्या यादीत आहेत. देशभरातील 2.6 लाखांहून अधिक रेस्टॉरंट्स स्विगीच्या माध्यमातून बिर्याणी देतात, तर 28,000 हजाराहून अधिक रेस्टॉरंट्स केवळ बिर्याणी बनवण्यात तरबेज आहेत.
कोणत्या शहराने सर्वात जास्त बिर्याणी ऑर्डर केली?
बिर्याणीच्या ऑर्डरबाबत विचार केल्यास ज्या शहरांनी सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली त्या शहरांमध्ये पहिला क्रमांक बेंगळुरुचा आहे. बेंगळुरूने जवळपास 24,000 बिर्याणी सेवा देणार्या रेस्टॉरंटसह आघाडी घेतली, त्यानंतर 22,000 हून अधिक मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि 20,000 हून अधिक रेस्टॉरंट्ससह दिल्लीने आघाडी घेतली आहे.
या वर्षाच्या जून महिन्यापर्यंत 7.2 दशलक्ष ऑर्डर देऊन बिर्याणीच्या खपामध्ये हैदराबाद अव्वल स्थानावर आहे. बेंगळुरू जवळपास 5 दशलक्ष ऑर्डरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चेन्नई जवळपास 3 दशलक्ष ऑर्डरसह तिसऱ्या स्थानावर आहे, असे कंपनीने सांगितले आहे.
चेन्नईतील एका बिर्याणीप्रेमीने एका ऑर्डरवर 31,532 रुपये खर्च केले. जवळपास 85 प्रकार आणि 6.2 दशलक्ष ऑर्डर्ससह, 'दम बिर्याणी' सर्वांची आवडती बिर्याणी ठरली आहे. तर 'हैदराबादी बिर्याणी'ला 2.8 दशलक्ष ऑर्डर्स मिळाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)