Health Tips : वयाच्या 30 व्या वर्षी महिलांच्या शरीरात काही बदल होतात. 40 वय झाल्यानंतर महिलांच्या शरीरातील मांसपेशी कमी होतात. तसेच हार्मोन्स असंतुलित देखील याच वयात होतात. स्वभाव बदलणं तसेच चिड चिड होणं इत्यादी समस्या देखील वयाच्या 40 वर्षी महिलांना जाणवू शकतात.
 
40 वय झाल्यानंतर महिलांना उच्च रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह इत्यादी आजारांचा सामना करावा लागतो.  त्यामुळे या वयाच्या महिलांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचं असेल तर तुम्ही या  गोष्टींचा समावेश आहारात करावा- 


लसूण-
लसूणचा आहारात समावेश केल्यानं 40 वर्षाच्या महिलांना हाडांसंबंधित आजार होत नाहित. तसेच लसूणमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल  ही तत्वे असतात.  एलिसिन नावाचे पोषक तत्व देखील यामध्ये असते, ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. 


हिरव्या पालेभाज्या 
हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, जिंक, व्हिटॅमिनk,ल्यूटिन, फॉलेट, कॅल्शियम आणि बीटा कॅरोटीन या पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते. या सर्व पोषत तत्वांमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, दृष्टी चांगली होते आणि हडे देखील मजबूत होतात. 
 
ड्राय फ्रूट्स
ड्राय फ्रूट्समध्ये  विटामिन्स, मिनरल्स, एंटीऑक्सीडेंट्स, हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबर असते. तसेच ड्राय फ्रूट्समुळे भूख देखील जास्त दिसत नाही. त्यामुळे वजन वाढत नाही. बदाम, अक्रोड इत्यादी ड्राय फ्रुट्स खाल्यानं ह्रदयासंबंधित आजार होत नाहित. 


डार्क चॉकलेट 
जर चॉकलेट खायला आवडत असेल तर 40 वर्षाच्या महिलांनी डार्क चॉकलेटचा समावेश डाएटमध्ये करावा, डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅवोनॉइड असते. ज्यामुळे ह्रदयासंबंधित आजार होत नाहित. तसेच डार्क चॉकलेटमुळे डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर हे आजार देखील होत नाहित. 


अंडी 
अंड्यांमध्ये विटॅमिन डी असतं. तसेच गुड फॅट आणि प्रोटिनचे प्रमाण देखील अंड्यामध्ये असते. त्यामुळे महिलांनी दररोज 1 किंवा 2 अंडी खाणे शारीरासाठी उपयुक्त ठरेल. 


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha