Aamir Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हटले जाते. आमिरच्या वाढदिवसानिमित्त  त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा देत आहेत. आमिर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. जाणून घेऊयात आमिरबद्दलच्या खास गोष्टी 


आमिरनं 18 एप्रिल 1986 रोजी रिना दत्तासोबत लग्नगाठ बांधली त्यांची लव्ह स्टोरी हटके आहे. आमिर खानचे घर हे रिनाच्या घराच्या जवळ होते. त्यावेळी रिना आणि आमिरची ओळख झाली. आमिर तेव्हा रिनाला लव्ह लेटर लिहित होता. त्यानंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. रिना आणि आमिरला जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुलं आहेत. नंतर 2002 साली आमिर आणि रिनानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 


आमिरचा दुसरा घटस्फोट
आमिर खान आणि किरण राव यांची ओळख लगान चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यावेळी आमिर आणि किरणच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी 2005 साली लग्न करायचा निर्णय घेतला. 2011 मध्ये आई- वडील झाले. त्यांच्या मुलाचं नाव आजाद आहे. पण आमिर आणि किरण यांचा देखील 2021 मध्ये घटस्फोट झाला. 


फातिमा सना शेखसोबत जोडलं गेलं नाव 
किरण रावसोबत घटस्फोट झाल्यानंतर आमिरचं नाव अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडलं जात होते. दंगल या चित्रपटात आमिर आणि फातिमानं सना शेखनं एकत्र काम केले होते. पण याबाबत दोघांनी कोणतीही माहिती दिली नाही. 


आमिर खानची संपत्ती 
रिपोर्टनुसार आमिर एका चित्रपटात काम करण्यासाठी 50 ते 60 कोटी मानधन घेतो. रिपोर्टनुसार, आमिरकडे 1562 कोटी संपत्ती आहे. मुंबईमध्ये आमिरचे घर आहे. या घराची किंमत 18 कोटी आहे. तसेच त्याच्याकडे   मर्सिडीज बेंज, रोल्स रॉयस, फोर्ड यांसारख्या आलिशान गाड्या देखील आहेत. 


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha