Kangana Ranaut On The Kashmir Files : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. देशात आणि जगात घडणाऱ्या घडामोडींवर नेहमीच ती तिची मतं व्यक्त करत असते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने  'गंगूबाई काठियावाडी' नंतर आता 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) सिनेमावर भाष्य केले आहे. 


कंगनाने काही दिवसांपूर्वी 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमावर वक्तव्य केले होते. त्यानंतर तिने आता सध्या चर्चेत असलेल्या 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर भाष्य केले आहे. 'द कश्मीर फाईल्स' हा सिनेमा 1990 च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. कंगनाने आता इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत सिनेमावर भाष्य केले आहे.


 


कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर 'द कश्मीर फाईल्स' सिनेमाचे रेटिंग शेअर केले आहेत. रेटिंग शेअर करत तिने लिहिले आहे, सिनेसृष्टीतील शांततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या सिनेमाची कथा चांगली असल्याने सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा भविष्यात एक केस स्टडी असू शकतो. 


 'द कश्मीर फाइल्स' सिनेमात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा सिनेमा भूतकाळ आणि वर्तमान दोन्हीवर भाष्य करणारा आहे. सोशल मीडियावर सध्या हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. 


संबंधित बातम्या


Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर येणार अभिनेत्री निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त


Movies On Tv : सिनेमागृहानंतर छोट्या पडद्यावरदेखील 'हे' सिनेमे आमने-सामने


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha