Viral video : लग्नाआधी अनेक मुलींना त्यांच्या होणाऱ्या पतीकडून काही अपेक्षा असतात. पण या अपेक्षा ती मुलं पूर्ण करतील की नाही याबाबत काही मुलींना शंका असते. लग्नानंतर नवऱ्याने कोण कोणती काम करावीत आणि कोणती करू नयेत याबाबत एका नवरीनं भन्नाट कॉन्ट्रॅक्ट तयार केलं आहे. लग्नाआधी या नवरीनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला एका स्टॅम्पपेपरवर सही करायला सांगितली. या नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ही नवरी तिच्याकडे असणारे स्टॅम्पपेपर दाखवतना दिसत आहे. स्टॅम्पपेपरमध्ये त्या नवरीनं लिहिलं आहे की, तिच्या नवऱ्यानं तिच्यासाठी रोज कराओके नाइटचं आयोजन करावे. तसेच त्यानं कोणत्याही वेब सीरिजचा स्पॉइलर तिला देऊ नये. 


पुढे या स्टॅम्पपेपरवर लिहिले आहे की, त्या मुलीच्या नवऱ्यानं तिला रोज तिन वेळा आय लव्ह यू म्हणावं आणि तिला सोडून कधीच बार्बीक्यू डिश खाऊ नये. सर्वात शेवटी या स्टॅम्पपेपरवर लिहिले आहे की, नवऱ्यानं तिची शपथ घेऊन नेहमी खरं बोलावं. 






व्हिडीओमधील या नवरीच्या भन्नाट अंदाजानं  नेचकऱ्यांची मनं जिंकली आहे. या व्हिडीओला 22,251 लाइक्स मिळाले असून अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha