एक्स्प्लोर

Health Care Tips : रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी घ्यावी अशी काळजी; आहारात आणि लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल

मेनोपॉजमध्ये पाळी अनियमितपणे येणे, हॉट फ्लशेस, घामाघूम होणे, झोपेचे तंत्र बिघडणे, मनोवस्थेमध्ये मोठे चढउतार होणे (मूड स्विंग्ज), चिडचिड होणे, सांधे आणि पाठदुखी अशा प्रकारच्या त्रासाला समोरे जावं लागते. 

Health Care Tips : महिलांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीच्या काळ प्रत्येक महिलेवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करतो. काहींच्या बाबतीत बदलाच्या या काळामध्ये पाळी अनियमितपणे येणे, हॉट फ्लशेस, घामाघूम होणे, झोपेचे तंत्र बिघडणे, मनोवस्थेमध्ये मोठे चढउतार होणे (मूड स्विंग्ज), चिडचिड होणे, सांधे आणि पाठदुखी अशा प्रकारच्या त्रासाला समोरे जावं लागते. 

इंडियन मेनोपॉज सोसायटी अँड साऊथ एशियन फेडरेशन ऑफ मेनोपॉज सोसायटीजचे पूर्व अध्यक्ष डॉ. जयदीप मल्होत्रा  हे सांगतात की, 'भारतीय महिला सर्वसाधारणपणे सरासरी 46.2 वर्षे वयामध्ये म्हणजे पाश्चात्य देशांतील स्त्रियांच्या तुलनेत पाच वर्षे आधी रजोनिवृत्तीच्या टप्प्यावर पोहोचतात. अंत:स्त्रावांच्या पातळीमध्ये होणा-या बदलांना म्हणजे हार्मोनल चेंजेसना तर रजोनिवृत्तीपूर्व काळापासून अर्थात पेरिमेनोपॉजच्या दरम्यानच सुरुवात झालेले असतात. हे बदल चार वर्षांपर्यंत किंवा कधी-कधी तर दशकभरही जाणवतात.  या काळामध्ये 80 टक्‍के स्त्रियांवर रजोनिवृत्तीच्या लक्षणांचा परिणाम होतो.' 

नोकरीसाठीची मुलाखत देण्यापासून ते आई-बाबा बनण्यापर्यंतच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याला सामोरे जाताना आपण जशी काही गोष्टींची तयारी करतो, तशीच तयारी या टप्प्यासाठीही करणे ही अधिक आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. मेनोपॉजचा काळ अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळण्यासाठी पुढील टीप्स फॉलो करु शकता. 

आपला आहार संतुलित ठेवा
हॉट फ्लॅशेसपासून ते वजन वाढणे रजोनिवृत्तीच्या या विविध लक्षणांच्या व्यवस्थापनामध्ये चांगला पोषण आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या आहारामध्ये कोणते पदार्थ असायला हवेत तसेच कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे. हे जाणून घेऊयात...

या पदार्थांचा समावेश करा
फळे आणि भाज्या : फळं आणि भाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. वर्षाच्या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये मिळणा-या भाज्या आणि फळांनी कोणताही अपाय होत नाही.

फायबर असलेले आणि कॅल्शियम आणि ड जीवनसत्वा असणारे पदार्थ : हिरव्या पालेभाज्या, राजमा आणि अखंड धान्ये यांसारख्या भरपूर प्रमाणात फायबर असलेल्या पदार्थांमुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकेल. दुग्धजन्य पदार्थ आणि ओमेगा –3 फॅटी आम्ल असणारे पदार्थ पोषणाचे उत्तम स्त्रोत मानले जातात.

हे पदार्थ टाळा
चरबीयुक्त मांस आणि प्रक्रिया फास्ट फूड, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले स्नॅक्स यांच्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते.  या पदार्थांमुळे कॉलेस्ट्रोलच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो किंवा त्यातून हार्ट अटॅकचा धोका वाढतो. शिवाय मसालेदार पदार्थांचे सेवन हॉट फ्लॅशेससारख्या लक्षणांना निमित्त ठरू शकते.

अल्कोहोल : अल्कोहोल जास्त प्रमाणात घेऊ नये. अल्कोहोलच्या नियमित सेवनामुळे मेनोपॉजच्या लक्षणांची तीव्रता वाढू शकते, झोप बिघडू शकते आणि मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्याही अधिक तीव्रपणे जाणवू शकतात.

कॅफीन : कॅफिनच्या प्रभावामुळे हॉट फ्लेशेस होण्याची शक्यता अधिक असते. त्याऐवजी गरम पेयाचा एखादा इतर पर्याय शोधणे उत्तम. 

आपले शरीर अनेक बदलांमधून जात असताना नियमित व्यायामाची सवय ठेवल्यास आरोग्य जपण्यास आणि हाडे बळकट होण्यास मदत होते, मन:स्थिती चांगली राहते आणि वजन वाढण्यासारखी लक्षणेही दूर राहतात. आपल्या दिनक्रमात तुम्ही पुढील काही व्यायामांचा समावेश करू शकता. 

कार्डिओ : एरोबिक व्यायाम किंवा कार्डिओ व्यायाम करा. व्यायामांमध्ये मोठ्या स्नायूंचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे असे व्यायाम करायला हवेत. याची सुरुवात तुम्ही अगदी 10 मिनिटांसाठी ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग, पोहणे, धावणे, सायकलिंग किंवा अगदी नृत्यापासूनही करू शकता व हळूहळू व्यायामाची तीव्रता वाढवू शकता. 

स्ट्रेग्न्थ ट्रेनिंग: डम्बेल्स उचलणे किंवा वजन उचलण्याच्या मशीन्सचा वापर करणे यामुळे तुमचे स्नायू आणि हाडे बळकट होतात आणि शरीरातील चरबीसुद्धा कमी होते. 

योगा : मना-शरीरावरील ताण हलका करणा-या ऊर्जादायी रिस्टोरेटिव्ह योगापासून ते शरीराला आधार देणा-या सपोर्टिव्ह योगापर्यंत ते कसरतीच्या अंगाने जाणा-या पॉवर योगापर्यंत सर्व प्रकारची योगासने ही लक्षणांपासून आराम मिळविण्याचा आणि शरीरावरील ताण दूर करण्याचा चांगला मार्ग आहे. योगासनांना ध्यानधारणा आणि श्वासाच्या व्यायामांची जोड दिल्यास त्यामुळे मन शांत आणि जागरुक होण्यासही मदत होते.

मानसिक स्वास्थ्य
पेरीमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या काळात अंत:स्त्रावांच्या पातळीत होत असलेल्या बदलांमुळे भावनिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या टप्प्यातून जाणा-या स्त्रियांना झोप न लागणे, चिंता, निरुत्साह, थकवा, ताण किंवा नैराश्यासारखी लक्षणे जाणवू शकतात. यातील बहुतांश लक्षणांचे व्यवस्थापन जीवनशैलीतील बदलांद्वारे करता येते. व्यायाम, सकस आहार घेण्याची सवय, शरीराची आर्द्रता टिकवणे, गाढ झोपेसाठी मनावरील ताण दूर करण्याचे मार्ग आजमावणे या सगळ्यामुळे लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. यापैकी कोणती पद्धत आपल्याला मानवेल हे शोधून काढा आणि वास्तवात गाठता येऊ शकतील अशी उद्दीष्ट्ये आखा.

डॉक्टरांचा सल्ला घ्या
चांगल्या आरोग्यामुळे मेनोपॉजच्या टप्प्यावर होऊ शकणारे ऑस्टिओपोरोसिस आणि हृदयविकारासारखे आनुषंगिक आजार टाळण्यास मदत होते. याशिवाय या काळात जाणवणा-या लक्षणे सुसह्य करण्यासाठी मेनोपॉजल हार्मोन थेरपी उपचारांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या थेरपीमध्ये तुमच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी राखली जाते व लक्षणांचे व्यवस्थापन केले जाते.  एखाद्या लक्षणाचा तुमच्यावर खूपच त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

'मेनोपॉज हा स्त्रियांसाठी परिवर्तनाचा काळ असतो, जो आव्हानात्मक ठरू शकतो. मेनोपॉजच्या शारीरिक, मानसिक आणि एकूणच भावनिक बाजूंबद्दल जागरुकता आणायला हवी, जेणेकरून स्त्रियांना आवश्यक असलेली मदत मिळू शकेल आणि त्यांना आपले आयुष्याच्या या टप्प्यावरही भरभरून जगता येईल असे अबॉटमध्ये आम्हाला ठामपणे वाटते. त्याचवेळी सर्वोत्तम उपचारपद्धतींच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आम्ही आरोग्यकर्मींसोबत करत आहोत व मेनोपॉज अनुभवणा-या स्त्रियांच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा आणि त्यांना केवळ शारीरिक लक्षणांच्या पलीकडे जात सर्वसमावेशक पद्धतीने आधार देण्याचा प्रयत्न करत आहोत.'  असं बॉट इंडियाचे मेडिकल डिरेक्टर डॉ. जेजो करनकुमार म्हणाले.

तेव्हा मेनोपॉजच्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होऊ शकेल? असा प्रश्न जर तुम्हा पडत असेल तर डॉक्टरांशी चर्चा करा, म्हणजे आयुष्यातील हा टप्पा तुम्हाला सहज पार पाडता येईल.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Leg Pain in Night : रात्री झोपताना पाय दुखतात? दुर्लक्ष करू नका, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget