पोहो पचण्यास हलके असतात. तसेच, पोह्यांमुळे सतत भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही आणि पोटही बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाण्यापासून बचाव होतो.
पोहे रक्तप्रवाहात ग्लूकोज संथ गतीने रिलीज करतं. ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही.
एक वाटी पोह्यांमध्ये जवळपास 206 कॅलरी असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर पोहे तयार करताना त्यामध्ये शेंगदाणे आणि बटाट्याऐवजी कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि इतर भाज्यांचा वापर करा.
पोह्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.
नाश्त्यासाठी पोहे खाणं हा उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. यामध्ये 75 टक्के कार्बोहायड्रेट, 23 टक्के फॅट्स आणि जवळपास 8 टक्के प्रोटीन असतं. तसेच पोह्यांमध्ये आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सहित अनेक महत्त्वपूर्ण खनिज मुबलक प्रमाणात असतात.
टिप : वरील माहिती रिसर्चच्या आधारावर देण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असंत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या :
हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी दररोज ब्रश करणं ठरतं फायदेशीर; संशोधनातून खुलासा
शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी खा 'हे' सुपरफूड्स
ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार
हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे