काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, दररोज दात घासल्याने फक्त दातांचं आरोग्यच ठिक राहत नाहीतर, हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही मदत मिळते. यूरोपीय जर्नल ऑफ प्रिवेंटिव कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून असं सांगण्यात आलं आहे की, सतत ब्रश केल्यामुळे दातांना आर्टिअल फिब्रिलेशन आणि हार्ट फेल्युअरचा धोका कमी होतो.
एका दिवशी कमीत कमी तीन वेळा ब्रश करणाऱ्या लोकांमध्ये आर्टिअल फिब्रिलेशनची शक्यता 10 टक्के आणि हार्ट फेल्युअरची शक्यता 12 टक्क्यांनी कमी होते. सोबतच हृदयाचे ठोक अनियमित होण्याचा धोकाही तीन वेळा ब्रश केल्याने कमी होतो. ही बाब साउथ कोरियात करण्यात आलेल्या एका संशोधनामधून समोर आली आहे.
मौखिक स्वच्छता राखली नाहीतर आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दातांची योग्य काळजी घेतली नाही तर तोंडात तयार होणारे बॅक्टेरिया हृदयरोगांचे कारण ठरू शकतात. यूरोपियन जर्नल ऑफ प्रिवेंटिव्ह कार्डिऑलॉजीमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये हे स्पष्ट झालं आहे की, ओरल हायजीन आणि हृदयाचं आरोग्य यात थेट संबंध आहे.
कोरियन राष्ट्रीय आरोग्य विमा प्रणालीतील 40 ते 79 वयोगटातील व्यक्तींवर करण्यात आलेल्या या संशोधनात 161,286 व्यक्तींचा समावेश होता. 2003 आणि 2004 दरम्यान करण्यात आलेल्या संशोधनातून असं समोर आलं की, ज्या व्यक्ती दररोज आपल्या दातांची काळजी घेतात. त्यांच्यामध्ये हृदय रोगांचा धोका कमी होतो.
टिप : सदर गोष्टी संशोधनांमधून सिद्ध झाल्या आहेत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या :
शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी खा 'हे' सुपरफूड्स
ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार
सावधान! त्वचेसाठी 'या' उत्पादनांचा वापर करणं ठरू शकतं घातक
कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!