अवकाळी पावसामुळे थंडीचा अद्याप पत्ता नसला तरिही वातावरणातील बदल हळूहळू जाणवू लागला आहे. बदलणाऱ्या वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. कारण बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. संतुलित आहार घेतल्याने आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. अशावेळी आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तसं पाहायला गेलं तर सर्व ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा उत्तम स्त्रोत असणाऱ्या बदाम खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे...

एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, दररोज जवळपास 20 ग्रॅम बदाम खाल्याने हृदयरोग आणि कॅन्सरपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच संशोधनामध्ये सांगितल्यानुसार, मुठभर बदाम दररोज खाल्याने लोकांमध्ये हृदय रोगाचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो. यामुळे 15 टक्के कॅन्सरचा धोका धोका कमी होतो.

बदाम खाण्याचे फायदे :

  • हिवाळ्यात बदाम खाणं फायदेशीर ठरंत, कारण त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होण्यास मदत होते.

  • दररोज सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खाल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.

  • सकाळी दुधासोबत बदामाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

  • बदामांचं सेवन केल्याने त्वचेच्या सौंदर्यासोबतच केसांचं सौंदर्य वाढण्यासही मदत होते.

  • हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही बदाम अत्यंत फायदेशीर ठरतं.

  • कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी बदाम अत्यंत उपयोगी ठरतं.

  • हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठीही बदाम खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

  • गर्भवती महिलांसाठीही बदामाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं.

  • बदामामध्ये असलेलं फायबर पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतं.

  • हाडांचं आरोग्य राखण्यासाठीही बदाम मदत करतं.


टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.