Yoga Benefits And Belly Fat : वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जिममध्ये जाऊन वर्क आऊट करतात. अनेक लोक स्लीम होण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन देखील फॉलो करत असतात. घरच्या घरी योगा करून झटपट वजन कमी करायचे असेल तर हे तीन योगासनं दररोज करा.
1. भुजंगासन :
- सर्वप्रथम जमीनीवर पालथे झोपा.
- हनुवटी छातीला टेकवा
- कपाळ जमिनीला टेकवा.
- हाताचे पंजे छातीजवळ ठेवा. त्यानंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन कमरेपपासूनचा भाग वर उचला. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा.
- दररोज पाच वेळा हे आसन केल्याने तुमच्या शरीरातील फॅट्स कमी होतील.
2. नौकासन : नौकासन केल्याने तुमची पचन क्रिया चांगली होते. तसेच वजन या योगासनाने फॅट्स देखील कमी होतात. हे असन करताना शरीराचा आकार नावेसारखा होतो म्हणून या आसनाला नौकासन असं म्हणतात.
असे करा नौकासन...
- आता आपले हात सरळ पुढे करा.
- पाय पुढे करा आणि त्यांना सरळ 45 अंशांवर पसरवा जेणेकरून तुमचे शरीर बोटीच्या आकारासारखे होईल. हे आसन तीन वेळा करा.
3. चक्रासन : या योगासनाचा प्रकार केल्याने पोटाची चरबी कमी होते. असे करा चक्रासन...
- सर्वप्रथम जमिनीवर उताणे झोपा.
- दोन्ही पाय दुमडा.
- पायांमध्ये अंतर ठेवा. दोन्ही हात कोपऱ्यांमध्ये दुमडून डोक्याजवळ ठेवा. आता कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग जमिनिपासून वर उचला. डोके शक्य तितके मागे ठेवण्याचा प्रयत्न करा.
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Jaggery Tea Benefits | जाणून घ्या गुळाचा चहा पिण्याचे फायदे आणि अतिसेवनामुळं होणारे तोटे
- Weight Loss | वजन वाढलंय? उपाय शोधताय?, 'हा' सोपा उपाय ट्राय करा
- Weight Loss: आता शरीराचं वाढलेलं वजन कमी करणार 'जपानी वॉटर थेरपी'
- सॅनिटायजरच्या चुकीच्या वापराने मुलं होऊ शकतात अंध! अभ्यासातून माहिती समोर