Health Tips हिवाळ्याच्या ऋतूमध्ये गूळ खाण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. हा पदार्थ गरम असल्यामुळं थंडीच्या दिवसांमध्ये गुळाचं सेवन करण्याला अनेकांची पसंती असते. काहीजण नुसताच गूळ खाण्याऐवजी गुळाचा चहा पिण्याला पसंती देतात. आरोग्यासाठी हा चहा अतिशय लाभदायी असतो.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळं गुळाचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या चहाचे कैक फायदे शरीराला या दिवसांमध्ये होतात. यामुळं पाचनशक्तीही सुरळीत राहते.
Video | '....हा आनंददायी किंवा सकारात्मक व्हिडीओ नाही'; आमिरच्या मुलीचा इशारा
- साखरेच्या तुलनेत गुळामध्ये अनेक व्हिटॅमिन असतात, ज्याचा शरीराला फायदाच होतो.
- मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठीही हा चहा फायदेशीर ठरतो.
- गुळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळं शरीरात रक्त कमी असल्यासही हा चहा प्यायल्यास हे प्रमाण नियंत्रणात येतं.
अती सेवन नकोच...
वजन वाढणं- 100 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 385 कॅलरी असतात. त्यामुळं डाएट करणाऱ्यांनी याचं सेवन प्रमाणात करावं. पण, वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हे सेवन फायद्याचं ठरतं.
मधुमेह - गुळाच्या अती सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं. 10 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 9.7 ग्रॅम इतकी साखर असते. त्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचं सेवन शक्यतो टाळलेलं बरं.
नाकातून रक्तस्त्राव - गूळ मुळातच एक गरम पदार्थ आहे. त्यामुळं गरम वातावरणात याचं सेवन केल्यास अनेकदा नाकातून रक्त वाहण्यासही सुरुवात होते. पोटातील गरमी वाढल्यामुळं याचे परिणाम त्वचेवरही दिसून येतात.
पॅरासिटीक इन्फेक्शन - अती गुळ खाणं ज्याप्रमाणं घातक ठरु शकतं त्याचचप्रमाणं खराब दर्जाचा आणि योग्य पद्धतीनं तयार न केला गेलेला गुळ खाणंही धोक्याचं ठरतं. त्यामुळं ही काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे.