ICC T20 WC 2021 : न्यूझीलंडच्या विजयानंतर उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या चार संघाची नावं स्पष्ट झाली आहेत. अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर ब गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघानं धडक मारली आहे. अफगाणिस्तान संघाचा पराभव करत न्यूझीलंडने धणक्यात उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा आज अखेरचा साखळी सामना असेल. अ गटामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघानं उल्लेखनीय कामगिरी केली. या तिन्ही संघाचे प्रत्येकी आठ गुण आहेत. पण नेट रनरेटच्या आधारावर इंग्लंड आणि ऑस्ट्रिलायनं उपांत्य फेरीत धडक मारली. ब गटामध्ये पाकिस्तानच्या संघानं निर्वादित वर्चस्व राखलं आहे. साखळी फेरीत पाकिस्तान संघानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. प्रत्येक सामन्यात पाकिस्तान संघानं एकहाती विजय संपादन केलाय. न्यूझीलंड संघाला फक्त एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. न्यूझीलंड संघानं सांघिक खेळाच्या बळावर उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 


आज, भारत आणि नामेबिया यांच्यात विश्वचषकातील अखेरचा साखळी सामना असेल. 10 नोव्हेंबरपासून उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. सर्व सामने सायंकाळी होणार आहे. पहिला उपांत्य सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड संघामध्ये अबू धाबीच्या मैदानावर रंगणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या तुल्यबळ संघामध्ये लढत होणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी दोन्ही संघ दुबईच्या मैदानावर उतरणार आहेत. दोन्ही उपांत्य सामन्यातील विजेते संघ 14 नोव्हेंबर रोजी टी-20 विश्वचषकासाठी भिडणार आहेत. अंतिम सामना दुबईच्या मैदानावर होणार आहे.











भारताची निराशाजनक कामगिरी –


यंदाच्या विश्वचषकात भारताची कामगिरी निराशजनक राहिली आहे. साखळी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला होता. तेव्हाच भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून होता. मात्र, न्यूझीलंड संघानं दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. आज, भारत आणि नामेबिया यांच्यामध्ये अखेरचा साखळी सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विश्वचषकात


विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी -


24 ऑक्टोबर- पाकिस्तानकडून 10 विकेटनं पराभव. 


31 ऑक्टोबर- न्यूझीलंडकडून 8 विकेटनं पराभव स्विकारला


3 नोव्हेंबर – अफगानिस्तानला 66 धावांनी हरवलं.


5 नोव्हेंबर- स्कॉटलँडचा 8 विकेटनं पराभव केला


8 नोव्हेंबर – नामेबियाविरोधात आज लढत