Valentines Day 2023 : प्रेम करा पण...; सार्वजनिक ठिकाणी 'या' चुका करु नका, नाहीतर खावी लागेल तुरुंगाची हवा
Valentines Day : भारतीय दंड विधान (IPC Act) कलम 294 नुसार, जर एखाद्या पुरुष किंवा महिलेने सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अश्लील कृत्य केले तर पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.
Valentine Day 2023 : सर्व प्रेमी युगुलं (Couples) दरवर्षी प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाईन डेची (Valentine Day) आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी 7 फेब्रुवारी पासून व्हॅलेंटाईन वीकला (Valentine Week) सुरुवात होते. या वीकमधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे (Valentine Day). या दिवशी आपलं प्रेम व्यक्त करणं अतिशय खास मानलं जातं. एकमेकांसमोर आपलं प्रेम व्यक्त करत प्रेमी युगलं आयुष्याची नवी सुरुवात करतात. काही कपल्स एखाद्या शांत ठिकाणी रोमँटिक डेटवर जाऊन खास क्षण एकमेकांसोबत घालवत व्हॅलेंटाईन डे साजरा करतात.
सार्वजनिक ठिकाणी 'या' चुका करु नका
सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याने अनेक वेळा जोडप्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. अशावेळी अनेक वेळा प्रकरण इतकं वाढतं की कपल्समध्ये वाद होतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कपल असाल तर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही कोणतं वर्तन करू नये, हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे.
किस केल्यास खावी लागेल तुरुंगाची हवा
जर तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किस केले तर ते तुमची अडचण वाढू शकते. सार्वजनिक ठिकाणी किस केल्यास तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. भारतीय दंड संहितेच्या (IPC - Indian Penal Code)) कलम 294 नुसार, जर एखाद्या पुरुष किंवा महिलेने सार्वजनिक ठिकाणी कोणतेही अश्लील कृत्य केलं तर पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.
तुम्ही रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, मार्केट, शाळा किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तुमच्या प्रेयसीला किंवा तुमच्या प्रियकराला किंवा तुमच्या पती किंवा पत्नीला चुंबन घेतल्यास पोलीस तुम्हाला आक्षेपार्ह वर्तनामुळे अटक करू शकतात. अशा परिस्थितीत, पोलिसांना आयपीसीच्या कलम 294 अन्वये कारवाई करण्याचा अधिकार आहे.
गाडीत किस केल्यावरही शिक्षा
सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतल्यास त्याच्यावर पोलीस कारवाई होऊ शकतात. सार्वजनिक ठिकाणी प्रेयसी किंवा प्रियकराने गाडीच्या आतमध्येही चुंबन घेतलं, तरी पोलीस त्यांच्यावर कारवाई करू शकतात. आयपीसीच्या कलम 294 नुसार सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही अश्लील वर्तन केल्यास गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि पोलीस कारवाई केली जाऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी कोणतेही अश्लील कृत्य केल्यास सामान्य व्यक्तीलाही पोलिसांकडे तक्रार करता येते.
अश्लील वर्तन केल्यास होईल 'ही' शिक्षा
सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्यास तीन महिने तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, जर कोणी अश्लील गाणी गायली, अश्लील शब्द वापरले किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणतेही अश्लील कृत्य केले, तरीही पोलिस त्याच्यावर भादंवि कलम 294 नुसार कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांनी आहे.
दरम्यान, कायद्यानुसार अश्लीलतेची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे कारवाई करायची की नाही हे पोलीस ठरवतील. म्हणूनच जर सार्वजनिक ठिकाणी तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या मनात प्रेम निर्माण झालं तर खबरदारी बाळगत तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी अधिक सोयीस्कर ठरेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही खाजगी तर तुम्ही त्यासाठी हॉटेल रूम किंवा एखादी खाजगी जागा वापरू शकता.