Travel : सुख आणखी काय असतं.. महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'या' धबधब्यांचं सौंदर्य म्हणजे स्वर्ग जणू! मुखातून 'Wow' आल्याशिवाय राहणार नाही..
Travel : पाण्याकडे बघून एक वेगळीच शांतता मिळते. समुद्रकिनारी बसून लाटा पाहायच्या असोत किंवा वाहणारा धबधबा असो, डोळ्यांना खूप आराम मिळतो
Travel : वाढती उष्णता.. शरीरातून घामाच्या धारा.. कामाचा ताण आणि शहरातील ट्राफिकला कंटाळलात? दोन क्षण शांततेचे मिळावे असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढावा लागेल. आज आम्ही तुम्हाला शांतता आणि डोळ्यांना गारवा देणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यांबद्दल सांगत आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती मिळेल, असं म्हणतात ना.. पाण्याकडे बघून एक वेगळीच शांतता मिळते. समुद्रकिनारी बसून लाटा पाहायच्या असोत किंवा वाहणारा धबधबा असो, डोळ्यांना खूप आराम मिळतो. पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर जाणे योग्य नाही, पण तुम्ही या दिवसात तुम्ही धबधब्यांना भेट देऊ शकता. पावसाळ्यात महाराष्ट्रात काही प्रसिद्ध धबधब्याचे सौंदर्य वाढते. पावसाळ्यात फिरणे जरा अवघडच आहे. पण इथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. जे पावसाळ्यात आणखी सुंदर दिसतात.
चायनामन धबधबा
महाबळेश्वर हे एक शांत हिल स्टेशन आहे. हा धबधबा कारवियाली रोडवर असून या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी टायगर पथ रोड हा उत्तम मार्ग आहे. चायनामन धबधबा हा सातारा जिल्ह्यात आहे. या धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी घनदाट जंगलातून जावे जाते आणि इथले नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे,
लिंगमाला धबधबा
महाबळेश्वर हे सर्वाधिक भेट दिलेल्या हिल स्टेशनपैकी एक आहे. लिंगमाला धबधबा हे ठिकाण येथील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिलेला धबधबा आहे. या धबधब्यांचा मुख्य स्त्रोत वेण्णा व्हॅली आहे, जिथून 600 फूट उंचीवरून पाणी कोसळते. या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर दृश्य पाहायला मिळेल. सुंदर इंद्रधनुष्य पाहण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता.
कुन धबधबा
हे धबधबे जुन्या पुणे-मुंबई मार्गावर आहेत, लोणावळा आणि खंडाळा या दुहेरी हिल स्टेशनच्या मध्यभागी वसलेले आहेत, जे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिलेल्या हिल स्टेशन्सपैकी एक आहेत. या धबधब्यांची उंची 659 फूट आहे. या कुन फॉल्समधील पाणी पांढऱ्या दुधासारखे दिसते. या धबधब्यांचे उत्तम दृश्य पावसाळ्यात आणि नंतरही पाहता येते.
दूधसागर धबधबा
इथले पाणी दुधासारखे पांढरे आहे. इथले पाणी दुधासारखे पांढरे आहे. दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडवी नदीवरील धबधबा आहे. धबधब्याची उंची सुमारे 1020 फूट आहे. हे धबधबे पाहण्यासाठी येणारे बहुतांश पर्यटक हे महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यातील आहेत. गोव्यात येणारे लोक या धबधब्याला नक्कीच भेट देतात.
धोबी धबधबा
महाबळेश्वरच्या सुंदर हिल स्टेशनमध्ये धोबी फॉल्स पाहता येतो. या धबधब्यांची उंची सुमारे 450 फूट असून इथले पाणी कोयना नदीत विलीन होते. हा धबधबा पेटीट रोड आणि जुना महाबळेश्वर रोड यांच्यातील कनेक्टिंग पॉईंटच्या अगदी जवळ आहे, या पॉईंटपासून हा धबधबा फक्त 3 किमी अंतरावर आहे. तुम्ही जून, जुलै ते डिसेंबर दरम्यान जाऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : महाराष्ट्रातील एक 'असा' चमत्कारी धबधबा! ज्याचे पाणी उलट दिशेने वाहते, पावसाळ्यात इथे भेट द्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )