Travel: काय सांगता! काश्मीरला जाणं आता आणखी सोपं? 2025 मध्ये प्रवाशांना मिळणार खास सुविधा? पृथ्वीवरील स्वर्ग अनुभवाल!
Travel: काश्मीरचा प्रवास सुकर व्हावा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने अशा काही सुविधा आणल्या आहेत, ज्यामुळे पृथ्वीवरील स्वर्ग खऱ्या अर्थाने अनुभवता येणार आहे.
Travel: ते म्हणतात ना, पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो काश्मीर आहे. इथले निसर्गसौंदर्य, बर्फाळ पर्वतांच्या उंच रांगा, हिमवर्षाव या गोष्टी अनुभवताना एक वेगळाच आनंद असतो. मात्र काही वेळेस येथे डोंगराळ भाग असल्याने अतिवृष्टी आणि भूस्खलन यासारख्या समस्यांनाही तोंड द्यावे लागते. अनेकदा वाहतुकीच्या निकृष्ट सुविधा आणि रस्त्यांमुळे प्रवाशांना त्या भागात प्रवास करताना अनेकदा अडचणी येतात. काश्मीरमध्ये हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टी होते. रस्त्यांवर बर्फाचा जाड थर साचतो. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण होतो. बरेच लोक हिंमत एकवटून काश्मीरला जातात, पण तासनतास ट्रॅफिक आणि बर्फवृष्टीमुळे एकाच ठिकाणी रात्र काढावी लागते. मात्र आता प्रवाशांच्या सोयीसाठी भारत सरकार काश्मीरचा प्रवास सुकर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरला जाणाऱ्या लोकांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी काही अशा सुविधा सुरू केल्या आहेत, ज्यामुळे प्रवास तर सोपा होईलच, पण काश्मीरमध्ये कमी वेळेत पोहोचणे देखील सोपे होईल. जाणून घेऊया..
काश्मीरचा प्रवास सुकर होणार..! वंदे भारतची खास सुविधा लवकरच..
दिल्ली ते काश्मीर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. आता प्रवाशांना वंदे भारतच्या चकाकत्या काचेतून काश्मीरच्या सुंदर दऱ्या अल्पावधीत पाहता येणार आहेत. आता बर्फवृष्टीमुळे लोकांना तासनतास रस्त्यावरच काढावे लागणार नाही. यासोबतच आता पर्यटकांना रस्त्यांवरील बर्फामुळे वाहने घसरण्याची चिंता करावी लागणार नाही. या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली आणि काश्मीर दरम्यानच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील अशी अपेक्षा आहे. ज्यांना काश्मीरला जायचे आहे ते या ट्रेनने प्रवास करण्याची संधी घेऊ शकतात. सध्या फक्त बारामुल्ला ते श्रीनगर आणि कटरा आणि काश्मीरमधील रामबन ते सांगलदान या गाड्या धावतात. त्यामुळे लोकांना काश्मीरला जाण्यासाठी बस आणि खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला, जे त्यांना खूप महागात पडते.
झेड-मोर बोगदा (सोनमार्ग बोगदा)
वंदे भारत ट्रेन व्यतिरिक्त, अलीकडेच पंतप्रधान मोदींनी काश्मीरला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 6.4 किमी लांबीच्या दुहेरी बोगद्याचे उद्घाटन केले आहे. हा बोगदा श्रीनगरला सोनमर्गशी जोडेल. त्यामुळे आता प्रवाशांना रस्ता बंद होण्याची चिंता करावी लागणार नाही. अनेकदा लोक काश्मीरला जायचे असते, पण ते वाटेत अडकतात. कारण अति बर्फवृष्टीमुळे महामार्ग 6 महिने बंद असतात. या बोगद्याच्या मदतीने तुम्ही गगनगीर ते सोनमर्ग हा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटांत पूर्ण कराल, तर पूर्वी तो पूर्ण करण्यासाठी 1 तास लागत होता.
हेही वाचा>>>
February 2025 Travel: तिरुपती.. नाशिक.. शिर्डी आणि 'ही' देवस्थानं, फेब्रुवारीत पालकांना घडवा देवदर्शन, भारतीय रेल्वे देतेय पुण्य कमावण्याची संधी!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )