Tourist Destination : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी गोव्याऐवजी 'या' ठिकाणांना भेट द्या, बजेट फ्रेंडली डेस्टिनेशनटी यादी पाहा
Travel Tips : नवीन वर्षात तुम्ही गोवा फिरण्याव्यतिरिक्त इतरही काही ठिकाणांना भेट देऊ शकता. बजेट फ्रेंडली डेस्टिनेशनटी यादी पाहा

Budget Friendly Destinations : सध्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाच्या स्वागताची (New Year 2024) जोरदार तयारी सुरु आहे. अनेक जण थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी गोव्याला (Goa) फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत आहेत. तुम्हीही गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा गोव्याला जाण्याचा प्लॅन करण्याऐवजी तुम्ही इतरही काही ठिकाणांना भेट देऊ शकता. गोव्याच्या समुद्रकिनारी (Goa Beach) थर्टी फर्स्ट किंवा न्यू ईयर सेलिब्रेट करण्याऐवजी तुम्ही इतरही ठिकाणी ही मजा घेऊ शकता.
तुम्हाला गोवा फिरण्याची इच्छा असेल तर, तुम्ही इतर काही बजेट फ्रेंडली आणि सुंदर डेस्टिनेशला भेट देऊ शकता. या डेस्टिनेशन कोणत्या हे जाणून घ्या.
गोकर्ण ( Gokarna )
दक्षिणेतील प्रसिद्ध समुद्रकिनारा नंदनवन गोकर्ण (Gokarna) बजेट फ्रेंडली आणि लक्झरी प्रवास करणाऱ्यांसाठीच आकर्षिण आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरताना तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. येथील समुद्रकिनाऱ्यांवर तुम्हाला गोव्यासारखा अनुभव मिळेल. जर तुम्ही बजेट फ्रेंडली प्रवास करत असाल तर या ठिकाणाला नक्की पसंती द्या.
Puducherry : पुद्दुचेरी
भारतातील बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणजे पुद्दुचेरी (Puducherry). फ्रेंच क्वार्टर, समुद्र किनारे, आरामदायक कॅफे आणि मंदिरं हे पुद्दुचेरीमधील आकर्षण आहे. पुद्दुचेरी हे फ्रेंच आणि भारतीय संस्कृतीचा एकत्र अनुभव घेण्यासाठीच उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला स्वस्तात प्रवास करायचा असेल आणि तर तुमच्यासाठी पुद्दुचेरी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
Kanyakumari : कन्याकुमारी
कन्याकुमारी (Kanyakumari) हे भारतातील सर्वोत्तम बजेट फ्रेंडली ठिकाणांपैकी एक आहे. येथील समुद्र किनारे, उत्कृष्ट वास्तुकला आणि मंदिरे फार सुंदर आहे. तुम्ही कुठेही ट्रिपचं नियोजन करत असाल, तर कन्याकुमारीला तुमच्या यादीत नक्की समावेश करा. कन्याकुमारीमध्ये राहणं खूप स्वस्त आहे आणि येथील प्रवासही खूप स्वस्त आहे.
Lakshadweep : लक्षद्वीप
लक्षद्वीप (Lakshadweep) हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथील समुद्रकिनारे भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणले जातात. येथे तुम्हाला परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. तुम्हाला गोव्यासारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी लक्षद्वीप डेस्टिनेशनपेक्षा चांगलं डेस्टिनेशन असूच शकत नाही. हे सामान्य बजेटपेक्षा थोडं महाग आहे, पण तुम्हाला आपण गोव्यापेक्षा कमी खर्च येईला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
North Goa Vs South Goa:गोव्यात फिरायला जाताय, नॉर्थ की साऊथ कोणती आहेत सर्वोत्तम ठिकाणं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
