Tea : कॉफी म्हणजे प्रेम, चहा म्हणजे आयुष्य,? भारतीय नेमके कोणत्या पेयाच्या प्रेमात?
चहा-कॉफी ही दोन्ही पेय जगभरात लोकांना आवडतात. भारतात जर घरात पाहुणे आले तर थेट चहा घेणार की कॉफी असा प्रश्न सर्रास विचारला जातो. अनेक देशांमध्ये चहा आणि कॉफी प्यायली जाते.
Tea : चहा-कॉफी ही दोन्ही पेय अशी आहेत की जी (Tea and Coffee drink) जगभरात लोकांना आवडतात. भारतात जर घरात पाहुणे आले तर थेट चहा घेणार की कॉफी असा प्रश्न सर्रास विचारला जातो. जगातील अनेक देशांमध्ये चहा आणि कॉफी प्यायली केले जाते. पण आज आपण कॉफीबद्दल बोलणार आहोत. पण आज आपण कोणता देश सर्वाधिक कॉफी पितो याबद्दल बोलणार आहोत आणि भारतातील लोक कॉफी पितात की चहाप्रेमी आहेत, हे देखील पाहणार आहोत.
फिनलँडमध्ये सर्वाधिक कॉफी प्यायली जाते!
फिनलँड हा युरोपियन देश कॉफी पिण्याच्या बाबतीत अव्वल आहे. फिनलँडमध्ये सामान्य माणूस दिवसातून 8 ते9 कप कॉफी पितो. तर काही ठिकाणी ही संख्या 30पर्यंत पोहोचते. फिनलंड हा थंड देश आहे, त्यामुळे स्वतःला उबदार ठेवण्यासाठी जास्त लोक नेहमीपेक्षा कॉफी पितात. एका प्रसिद्ध अहवालानुसार, फिनलँडचा एक नागरिक वर्षभरात सरासरी 9.6 किलो कॉफी वापरतो.
नॉर्वे दुसऱ्या, नेदरलँड्स तिसऱ्या क्रमांकावर
कॉफी पिण्याच्या बाबतीत फिनलँडनंतर नॉर्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॉर्वेमध्ये एक व्यक्ती वर्षभरात सरासरी 7.2 किलो कॉफी वापरतो. नेदरलँड्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. एका रिपोर्टनुसार, नेदरलँड्समधील एक व्यक्ती दरवर्षी 6.4 किलो कॉफी वापरतो. हे सर्व देश अतिशय थंड प्रदेश असल्याने येथे कॉफीचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते.
भारतात कॉफी की चहा?
फिनलँडमध्ये सरासरी व्यक्ती वर्षाला 9.6 किलो कॉफी पिते, तर नॉर्वे 7.2 किलो आणि नेदरलँड्समध्ये 6.4 किलो कॉफी चे सेवन करते. ही आकडेवारी पाहिली तर भारतात कॉफी पिणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. भारतात एक व्यक्ती वर्षभरात केवळ 100 ग्रॅम कॉफीचे सेवन करते. मात्र, चहा पिण्याच्या बाबतीत भारत अनेक देशांच्या पुढे आहे.
चहा प्यायल्यावर लगेच पाणी का पिऊ नये?
चहावर पाणी पिण्याची तुम्ही तुमची सवय सुधारली नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दातदुखीचा त्रास होऊ शकतो. केवळ एवढंच नव्हे तर अपचन, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिटी आणि गॅसचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते. घसादुखीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे चहानंतर पाणी पिण्याची चूक करू नका. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने काही जणांच्या नाकातून रक्त येऊ लागते. अशी लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे. आणि या चुकीतून धडा घेत ही वाईट सवय सोडून दिली पाहिजे.
इतर महत्वाची बातमी-