एक्स्प्लोर

Health Tips : रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता प्या ऊसाचा रस , काय आहेत फायदे घ्या जाणून 

ऊसाचा रस शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते आणि याचे अनेक फायदे देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया ऊसाच्या रसाचे फायदे.

Sugarcane Juice Benefits : ऊसाचा (Sugarcane) रस हे आरोग्यदायी पेय मानले जाते. सगळ्या ऋतूत ऊसाचा रस पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. तुमची डिहायड्रेशनची समस्या देखील ऊसाच्या रसामुळे कमी होण्यात मदत होते. याशिवाय ऊसाचा रस आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देतो. ऊसाच्या रसामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्त्वे, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. पोषक तत्वांनी युक्त असा हा ऊसाचा रस तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.  जाणून घेऊया ऊसाच्या रसाचे फायदे.

एनर्जी बूस्टर म्हणूव काम करते

जर तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेट ठेवायचे असेल, तर ऊसाचा रस प्यायल्याने तुम्हाला झटपट ऊर्जा मिळू शकते. हे पेय खूप कमी वेळात तुमचा थकवा दूर करते. हे प्यायल्याने तुम्ही ताजे आणि उत्साही राहता. ऊसाचा रस शरीराला हायड्रेट करून थकवा कमी करण्यास मदत करतो. या रसामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

कावीळ मध्ये ऊसाचा रस ठरतो उपयुक्त

आयुर्वेदानुसार काविळीवर ऊस हा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे तुमचे लिव्हर निरोगी राहते. ऊसाच्या रसामध्ये विविध अँटिऑक्सिडंट असतात, जे लिव्हरला संसर्ग होण्यापासून वाचवतात. 

पचन सुधारते

ऊसाचा रस पचनाच्या समस्यांवर टॉनिक म्हणून काम करतो. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे पोटातील पीएच पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. ऊसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे तुमची पचनसंस्था स्वच्छ करते. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

गरोदर महिलांसाठी ऊसाचा रस खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही आई होणार असाल तर तुमच्या आहारात याचा समावेश जरूर करा. यामध्ये फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन-बी9 असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. याशिवाय, संशोधनानुसार, ऊसाचा रस स्त्रियांमध्ये ओव्हुलेशनच्या समस्या कमी करतो, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते.

अशक्तपणा कमी होण्यात मदत होते

ऊस आणि त्याचा रस अशक्तपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठी अधिक फायदेशीर आहे. त्यात भरपूर लोह असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. ज्यांना अॅनिमियाची समस्या आहे त्यांनी ऊसाचा रस जरूर प्यावा. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. 

हाडे मजबूत होतात

ऊसाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात जे हाडांना मजबूत करतात. त्यामुळे रोज ऊसाचा रस प्यायल्याने हाडांच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.

 

इतर महत्वाच्या बातम्या

Traffic Challan: कारसोबत भरपूर फोटो क्लिक करा, व्हिडीओ बनवा; पण 'ही' चूक केल्यास बसेल खिशाला फटका

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget