एक्स्प्लोर
स्पाईसजेटची स्वातंत्र्यदिनी विशेष ऑफर, केवळ 399 रुपयांत विमान सफर
नवी दिल्ली: विमान प्रवाश्यांना पुन्हा एकदा स्वस्त तिकीट दरांचा फायदा मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कॉस्ट एअरलाईन्स स्पाईसजेटने 'ग्रेट इंडिपेंडेंस डे सेल ऑफर' सुरु केली आहे. या ऑफर अंतर्गत स्पाईसजेटच्या विमान प्रवाशांना केवळ 399 रुपये तिकीट मिळणार आहे. ही ऑफर 9 ते 11 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये 18 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंतचे तिकीट बुकींग करता येणार आहे.
स्पाईसजेटच्या या ऑफरमध्ये अहमदाबाद - मुंबई, अमृतसर - श्रीनगर, बंगळुरु - चेन्नई, बंगळुरु -कोची, कोयम्बतूर - हैदराबाद, जम्मू - श्रीनगर, मुंबई - गोवा, मुंबई - हैदराबादचा प्रवास या तिकीट दरामध्ये करता येणार आहे. याशिवाय, स्पाईसजेटने काही ठराविक आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या तिकीट दरात 2,999 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑफरमध्ये ज्या मार्गांचा समावेश आहे, त्यातील स्वस्त तिकीट दर हे बेस फेअरसाठी आहेत. यामध्ये विमान प्रवाशांना करांसोबतच सरचार्ज वेगळा द्यावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात दुबई - दिल्ली आणि दुबई - मुंबईचे तिकीट बुक करता येऊ शकते.
स्पाईसजेटच्या वेबसाईटवरून, किंवा स्पाईसजेटच्या अॅपच्या माध्यमातूनही हे तिकीट बुकींग करता येणार आहे. या ऑफर अंतर्गत केलेले तिकीट बुकींग रिफंडेबल आहे. त्यामुळे एखादेवेळेस तुम्ही तुमचे तिकीट कॅन्सल केल्यास, तुम्हाला त्याचे पैसे परत मिळू शकतील. तिकीटांची संख्याही मर्यादीत असल्याने हे तिकीट 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्वावर ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. स्पाईसजेटची ही ऑफर केवळ नॉन स्टॉप विमान प्रवासासाठीच उपलब्ध आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement