एक्स्प्लोर

Skin Care Tips : केस आणि त्वचेसाठी व्हिटॅमिन 'ई' असलेले पदार्थ खा, जाणून घ्या याचे महत्त्व

Skin Care Tips : उन्हाळ्यात घामामुळे केस कोरडे होऊन त्वचा निर्जीव होते. अशा वेळी व्हिटॅमिन ईने समृद्ध असलेल्या या पदार्थांचे सेवन नक्की करा.

Skin Care Tips : उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असते. हात, पाय, त्वचा आणि ओठ कोरडे होतात. कडक सूर्यप्रकाशाचा केसांवर परिणाम होतो, त्यामुळे केसही कोरडे आणि निर्जीव होतात. उन्हाळ्यात बहुतेक लोक त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष दिले पाहिजे. त्वचा आणि केसांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही आहारात व्हिटॅमिन ई समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. यामुळे केस आणि त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहते. व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खाऊनही कोरडेपणाची समस्या कमी करू शकता. व्हिटॅमिन ईची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही या गोष्टींना तुमच्या आहाराचा भाग बनवा. 

व्हिटॅमिन ई समृध्द अन्न :

1. बदाम - बदाम हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. उन्हाळ्यात दररोज मूठभर भिजवलेले बदाम खावेत. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात मिळते. बदाम खाल्ल्याने त्वचा आणि केस मुलायम होतात. 

2. सूर्यफुलाच्या बिया - शरीरातील व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी बियांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. बिया खाल्ल्याने केस गळणे, पांढरे होणे आणि रुक्षपणाची समस्या कमी होते. व्हिटॅमिन ई साठी तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता. आपण सूर्यफूल तेल देखील वापरू शकता.

3. एवोकॅडो - फळांमध्ये एवोकॅडो जरूर खा. हे फळ महाग असले तरी याच्या सेवनाने तुमची त्वचा आणि केस चमकू लागतील. व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही एवोकॅडोला आहाराचा एक भाग बनवा. एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन-सी देखील आढळतो.

4- शेंगदाणे - व्हिटॅमिन ई साठी तुम्ही शेंगदाण्याला तुमच्या आहाराचा एक भाग बनवू शकता. जेवणात शेंगदाणे कोणत्याही प्रकारे वापरा. उन्हाळ्यात शेंगदाणे भिजवून चटणी करून खाऊ शकता. याशिवाय शेंगदाणे सर्व ऋतूंमध्ये स्नॅक्सच्या स्वरूपात खाऊ शकतात. 

5- हिरव्या पालेभाज्या - हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई देखील आढळते. विशेषत: पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते. यासाठी पालकाचा आहारात नक्कीच समावेश करा. आयर्न आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता पालक खाल्ल्याने भरून काढता येते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Embed widget