एक्स्प्लोर
यंदाच्या दिवाळीत चिनी मालाच्या विक्रीत 45 टक्के घट होण्याची शक्यता
असोचॅम-सोशल फाऊंडेशनने याबाबतचा सर्वे केला असून, सर्वेक्षणानंतर यंदाच्या दिवाळीत चिनी मालाच्या विक्रीत 45 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली : यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तूंच्या विक्रीत मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असोचॅम-सोशल फाऊंडेशनने याबाबतचा सर्वे केला असून, सर्वेक्षणानंतर यंदाच्या दिवाळीत चिनी मालाच्या विक्रीत 45 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संस्थेच्या वतीने अहमदाबाद, बंगळुरु, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, जयपूर, लखनऊ आणि मुंबई आदी शहरांमध्ये सर्वे करण्यात आला. या सर्वेक्षणामध्ये चिनी उत्पादनांच्या मागणीचं मुल्यांकन केलं गेलं.
या मुल्यांकनानंतर, यंदाच्या दिवाळीत चिनी मालाच्या विक्रीत 40 ते 45 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चिनी वस्तूंमध्ये फॅन्सी लायटिंग, लॅम्पशेड, लक्ष्मी-गणपतीची मूर्ती, रांगोळी, फटाके आदींचा समावेश आहे.
सर्वेक्षणानुसार, यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तूंच्या तुलनेत, भारतीय उत्पादनांना ग्राहकांकडून जास्त पसंती मिळत आहे.
दरम्यान, गेल्यावर्षीच्या दिवाळीत चिनी उत्पादनांच्या विक्रीत 30 टक्क्यांची घट झाली होती. यंदा 45 टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने, भारतीयांमध्ये चीन विरुद्धचा वाढता असंतोष स्पष्ट होत आहे.
सूचना : सर्वेक्षणातील दाव्यांची एबीपी माझाने पडताळणी केलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement