Gopalkala 2023 : गोविंदा आला रे...गोपाळकालाचा इतिहास आणि महत्त्व नेमकं काय? वाचा सविस्तर
Gopalkala 2023 : श्रीकृष्ण जन्माचे स्मरण ठेवण्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.
Gopalkala 2023 : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami 2023) उत्सव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दरम्यान, मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि हाच उत्साह आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. कृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्याच दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. आजही राज्यभरात विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, गोविंदा पथकंही हंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, गोपाळकालाचा इतिहास आणि महत्त्व नेमकं काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
दहीहंडीचा इतिहास
बाळगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी ठेवत असे. पण, श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
दहीहंडीचा जल्लोष
दहीहंडी हा भारतातील एक मनोरंजन आणि स्पर्धात्मक कार्यक्रम आहे, जो कृष्ण जन्माष्टमी हिंदू सणाशी संबंधित आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी या कार्यक्रमासाठी एक मटके उंच ठिकाणी लटकवलेले असते. हे मातीचे भांडे दही, लोणी किंवा इतर दुधाच्या पदार्थाने भरलेले असते. हे भांडे तोडण्यासाठी तरुण पुरुष आणि मुले, तसेच मुलींचा संघ तयार करून थर रचले जातात. या दरम्यान लोक पथकांना घेरतात, गातात, नाचतात.
हा कार्यक्रम कृष्णाच्या आख्यायिकेवर आधारित आहे. कृष्ण लहानपणी मित्रांबरोबर गोकुळमधील घरांतून लोणी आणि दही चोरून न्यायचा. म्हणूनच त्याला माखन चोर किंवा लोणी चोर असेही म्हटले जाते. गोकुळामधील लोक त्यांची भांडी उंच ठिकाणी लटकवून त्याची चोरी टाळण्याचा प्रयत्न करायचे, परंतु कृष्ण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग शोधून काढायचा.
श्रीकृष्ण जन्माचा इतिहास आणि गोकुळातील वास्तव्य
श्रीकृष्णाचा मथुरा नगरीमध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पेाटी जन्म झाला. ते भगवान विष्णुचा आठवा अवतार होते असेही मानले जाते. दुष्ट कंस मामाचा वध करण्यासाठी भगवान विष्णुने अवतार घेतल्याने यास कृष्णवतार असेही म्हटले जाते. देवतीच्या उदरी जन्मलेल्या कृष्णाला वासुदेवाने कंसाच्या भितीने रात्रोरात गुप्तपणे गोकुळात यशोदेकडे पोहचविले. गोकुळात कृष्ण जन्मामुळे आनंदीआंनद झाला. विष्णूने या दिवशी आपल्या आठव्या अवतारात श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतला. भगवान श्रीकृष्णाचे बालपण गोकुळात गेले. माता यशोदा आणि पिता नंद हे त्यांचे पालनकर्ते होते. गोकुळात श्रीकृष्णांनी लहान वयात अनेक कृष्णलीला दाखवल्या. गोकुळामध्ये श्रीकृष्णाने बालपणी गोकुळ वृदांवनातील असंख्य गोपिकांना आपल्या रूपांनी आकर्षित केले. मधुर बासरीने वेड लावले.
श्रीकृष्ण जन्माष्टमी / गोपाळकाला (दहीहंडी) सण कसा साजरा करतात
भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा श्रावणातील अष्टमीला झाला होता आणि त्यारात्री रोहीणी नक्षत्राच्या शुभकाळ होता. ज्या – ज्या वर्षी हा योग जुळून येतो. त्या वर्षाची गोकुळअष्टमी सर्वात शुभ मानली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीला हिंदू लोक खूप महत्त्व देतात. या दिवशी लोक रात्रभर जागरण करतात. श्रीकृष्णाचे भजन, किर्तन, आरती करतात. दिवसभर उपवास करून श्रीकृष्णाचे मंदिर या दिवशी आकर्षक फुलांनी, दिव्यांनी सजवली जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुस-या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. अनेक लोक मोठया आनंदाने यामध्ये सहभागी घेतात. लोक वाईट शक्तीपासून तारणारा देव म्हणून कृष्णास मानतात.
महत्त्वाच्या बातम्या :