Ganesotsav 2024: उजव्या सोंडेची मुर्ती घ्यावी की डाव्या सोंडेची? बाप्पाची मुर्ती निवडण्यापूर्वी हे वाचाच..
सोंडेच्या बाजूनुसार बाप्पाचे चार प्रकार ठरतात. . पण नक्की डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीत आणि उजव्या सोंडेच्या मूर्तीत काय फरक आहे? जाणून घेऊ..
Ganpati Bappa: गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे तीन दिवस राहिले आहेत. सगळ्यांच्या घरात उत्साह संचारला असून साफसफाई, डेकोरेशन, बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी अशा कितीतरी कामांमध्ये सर्वजण बुडून गेले आहेत. गल्लोगल्ली ढोल पथक सज्ज झाली आहेत. बाप्पाच्या मूर्ती सिलेक्शनसाठी धावपळ सुरू आहे. दरम्यान गणपती बाप्पाची उजवीकडे असावी की डावीकडे असावी असा गोंधळ अनेकांना पडला असेल. पण नक्की डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीत आणि उजव्या सोंडेच्या मूर्तीत काय फरक आहे? जाणून घेऊ..
गणपती हा सर्व दुःखांचा हरता मानला जातो कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला पूजेच्या प्रारंभी गणेश पूजन होतं. साधारणपणे बाप्पाच्या बहुतांश मुर्त्यांची सोंड डाव्या बाजूला असते. पण काही मुर्त्या अपवादात्मक असतात काही मुर्त्यांची सोंड उजव्या बाजूलाही असते. याबाबत अनेक समज आहेत.
सोंडेच्या बाजूवरून ठरतात चार प्रकार
सोंडेच्या बाजूनेनुसार बाप्पाचे चार प्रकार ठरतात. गणपतीच्या सोंडेचे अग्र उजव्या हाताकडे वळलेले असेल तर तो सिद्धिविनायक मानला जातो. तर सोंड जर डाव्या हाताकडे वळलेली असेल तर तो ऋषिविनायक असतो. सोंडेचे टोक जर उजव्या हाताकडे खाली वळले असेल तर त्या गणपतीला बुद्धी विनायक म्हणतात तर सोंडाचे टोक डाव्या हाताकडे वळलेले असेल तर तो शक्ती विनायक मानला जातो.
सिद्धिविनायक मोक्षसिद्धीसाठी ओळखला जातो
सोंडेचे अग्र उजव्या बाजूला असणारी मूर्ती ही सिद्धिविनायकाची मानली जाते. सिद्धिविनायक हा मोक्षसिद्धीप्रद मानला जातो त्यामुळेच त्याची काही विशिष्ट प्रकारे आराधना करायची असेल तर उजव्या सोंडेचा गणपती पुजला जातो. सोडोपचारे पूजा करत असताना काही नियम पाळावे लागतात.
उजव्या सोंडेचा गणपती कडक शिस्तीचा
उजव्या सोंडेचा गणपती कडक शिस्तीचा असतो असं मानलं जातं. त्याच्या पूजा अडचणीत अनेक नियम पाळावे लागतात. ही मूर्ती पूजेत ठेवणाऱ्याने विशेष काळजी घ्यायला हवी असं सांगितलं जातं. या मूर्तीची संपूर्णपणे सोवळ्यात पूजा करावी लागते. गणेशाचा आवडता रंग लाल असल्याने पूजा करणाऱ्यांना लाल वस्त्र परिधान करून मूर्तीवरही लाल रंगाची फुले वाहण्यास सांगितले जाते. ज्या घरात उजव्या सोंडेचा गणपती आहे त्या घराचा दार कधीही बंद करू नये असं जाणकारांचं मत आहे.
शास्त्रानुसार उजव्या सोंडेचा गणपती..
गणपती बाप्पाची सोंड कोणत्या बाजूला आहे हे शरीरातील नाडी पूजनाचे ही प्रतीक समजलं जातं. जेव्हा गणेशाला त्याच्या सोंडेने उजव्या बाजूला चित्रित केलं जातं तेव्हा ते इडा नाडीचे प्रतिनिधित्व करते. हिंदू पौराणिक कथा नुसार मानवी शरीरातील ही नाडी तीन मुख्य ऊर्जावाहिन्यांपैकी एक समजली जाते. ही नाडी शरीराच्या डाव्या बाजूला आहे. ती चंद्र स्त्री शक्ती आणि ग्रहण क्षमता अंतर्ज्ञान या गुणांची जोडलेली असल्याचे सांगितलं जातं. गणेशाची सोंड उजव्या बाजूला असणं म्हणजे ऊर्जा संतुलन आणि सुसंवाद शांतीच प्रतीक समजलं जातं.
डाव्या सोंडेचा गणपती काय दर्शवतो?
डाव्या सुंडेचा गणपती हा पिंगळा नाडीचे प्रतिनिधित्व करतो जी मानवी शरीरातील इतर मुख्य ऊर्जावाहिन्यांपैकीच एक आहे. शरीराच्या उजव्या बाजूला असणारी ही नाडी सूर्य, ऊर्जा आणि कृती यांचा समन्वय साधणारी तसेच तर्क या गुणांची जोडणारी आहे असं म्हटलं जातं. डाव्या बाजूला असणारी सोंड ही बुद्धी आणि ज्ञानाची शक्ती दाखवते असं मानतात.