Ganesh Chaturthi 2023 : पुढच्या वर्षी लवकर या! आज दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन, बाप्पाच्या विसर्जनाचे मुहूर्त जाणून घ्या
Ganesh Visarjan 2023 : मंगळवारी गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाचा उत्सव दहा दिवस चालणार आहे. बाप्पाचे विसर्जन करणार्यांनी शुभ मुहूर्त जाणून घ्यावा.
Ganesh Visarjan 2023 : गणेश चतुर्थीपासून (Ganesh Chaturthi 2023) मंगळवारपासून 10 दिवस चालणाऱ्या गणेश महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी घरोघरी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. विधीनुसार दहा दिवस दररोज गजाननजींची पूजा केली जाईल आणि त्यानंतर 28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन होईल. या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो, जरी काही लोक दीड दिवस, पाच दिवस आणि सात दिवस गणेशाची स्थापना करतात. पंचागानुसार, या वर्षी वेगवेगळ्या दिवशी गणेश विसर्जनाची शुभ वेळ आणि तारखेबद्दल जाणून घ्या.
विदेशातही साजरा होतो गणेशोत्सव
भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी गणपतीची घरोघरी स्थापना केली जाते. मोठ्या आनंदाने संपूर्ण भारतात नव्हे तर विदेशातही हा गणेशोत्सव साजरा केला जातो.यादिवशी गणपतीची उपासना करणे हे पूर्वापार सुरू आहे.त्यातून सार्वजनिक गणेशोत्सव पण सुरू झाले. वेगवेगळ्या प्रांतात याचे महत्व त्या त्या ठिकाणच्या प्रथा,परंपरानुसार असतात. महाराष्ट्रात कोकणात गणोशोत्सवाला असणारे महत्व अजून काही निराळेच आहे हे सर्वज्ञात आहेच. संपूर्ण जगात भारतीय संस्कृती पसरली असून त्या ठिकाणी हिंदूंची मंदिरे आहेत. सर्वच जण कोणत्याही कार्यरंभी गणपती पूजन करतो. भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव साजरा करतो, तर माघ गणेश जयंती साजरी करतो
गणेश विसर्जन 2023 तारीख
हिंदू धर्मानुसार, देवतांच्या स्थापनेनंतर त्यांचे विसर्जन करणे फार महत्वाचे आहे. परंपरेनुसार 10 दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते. यावर्षी अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर 2023 रोजी आहे.
गणेश विसर्जन 2023 मुहूर्त, तारीख शुभ वेळ
गणेश चतुर्थी - 19 सप्टेंबर 2023
गणेश विसर्जन (दीड दिवस) मुहूर्त - 20 सप्टेंबर - दुपारी 3.18 ते संध्याकाळी 6.18
7.49 रात्री - 12.15 मध्यरात्री, 21 सप्टेंबर
3.12 पहाटे - 4.40 पहाटे, 21 सप्टेंबर
गणेश विसर्जन मुहूर्त तिसऱ्या दिवशी
21 सप्टेंबर 2023 - सकाळी 6.09 ते 7.39
सकाळी 10.43 - दुपारी 3.15
दुपारी 4.48 - रात्री 9.15
12.15 रात्री - 1.42 मध्यरात्री, 22 सप्टेंबर
गणेश विसर्जन मुहूर्त पाचव्या दिवशी 23 सप्टेंबर 2023
पहाटे 6.11 ते 7.40 सकाळी
सकाळी 9.12 - सकाळी 10.40
दुपारी 1.43 ते 7.42 सकाळी
10.44 रात्री - 12.12 मध्यरात्री, 24 सप्टेंबर
अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जन
सकाळी 6.11 ते 7.40
सकाळी 10.42 - दुपारी 3.10
दुपारी 4.41 ते रात्री 9.10
12.12 रात्री - 1.42 दुपारी, 29 सप्टेंबर
गणेशोत्सव 2023
19 सप्टेंबर 2023 - गणेश चतुर्थी
20 सप्टेंबर 2023 - ऋषी पंचमी
22 सप्टेंबर 2023 - गौरी पूजन
23 सप्टेंबर 2023 - गौरी-गणपती विसर्जन
25 सप्टेंबर 2023 - परिवर्तनिनी एकादशी
26 सप्टेंबर 2023 - पंचक सुरू होते, वामन जयंती
27 सप्टेंबर 2023 - प्रदोष व्रत
28 सप्टेंबर 2023 - अनंत चतुर्दशी, गणेश विसर्जन
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Astrology : महिलांनी 'या' सवयींपासून दूर राहावे, अशा घरात देवी लक्ष्मी फार काळ टिकत नाही, जाणून घ्या