Durga Ashtami 2023 : दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा 'हे' खास उपाय, देवी महागौरीची होईल कृपा!
Durga Ashtami 2023 : नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या उपायांनी व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात, अशी मान्यता आहे
![Durga Ashtami 2023 : दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा 'हे' खास उपाय, देवी महागौरीची होईल कृपा! durga ashtami 2023 marathi news remedies do these remedies devi durga Durga Ashtami 2023 : दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा 'हे' खास उपाय, देवी महागौरीची होईल कृपा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/e2aa58e07c0bcc5e50e1bb4af3f9946e1697956446979381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Durga Ashtami 2023 : नवरात्रीचा आठवा दिवस : नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या उपायांनी व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि घरात सुख-शांती नांदते, अशी धार्मिक मान्यता आहे.
अष्टमीला दुर्गा मातेच्या महागौरी रूपाची पूजा करण्याची परंपरा
यंदा शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी 22 ऑक्टोबर 2023 रोजी येत आहे. या दिवशी दुर्गा मातेच्या महागौरी रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी आई महागौरीच्या पूजेसोबत कन्यापूजाही केली जाते. असे केल्याने देवी भगवती प्रसन्न होते. दुर्गा अष्टमीच्या दिवशी विशेष उपाय केल्याने माता महागौरी आपल्या भक्तांना ऐश्वर्य, समृद्धी आणि सुखाचा आशीर्वाद देते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे भक्तांना अपेक्षित परिणामही मिळतो. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार काही खास उपाय केले जाऊ शकतात.या उपायांबद्दल जाणून घेऊया.
मेष
मेष राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवीला गुळ किंवा खीर अर्पण करावी. जर तुम्ही या दिवशी कन्या पूजा करत असाल तर जेवणानंतर स्टेशनरीच्या वस्तू मुलींना भेट द्याव्यात.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनी महाअष्टमीच्या दिवशी काळ्या तिळाचा हवन करावा. यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना खेळणी भेट म्हणून दिली जाऊ शकतात.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी दुर्गाला केळी अर्पण करावी. यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही वस्तू भेट म्हणून दिली जाऊ शकते. असे केल्याने देवी माता प्रसन्न होतात असे मानले जाते.
कर्क
कर्क राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी भगवतीची 'ओम दुं दुर्गाय नमः' अशी प्रार्थना करावी. मंत्राचा जप करावा. या दिवशी कन्यापूजेच्या वेळी तुम्ही मुलींना रुमाल भेट देऊ शकता.
सिंह
सिंह राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला महागौरीला लाल रंगाची चुनरी आणि मेकअपचे साहित्य अर्पण करावे. या दिवशी मुलींना कोणतेही तांब्याचे भांडे भेट देऊ शकतात.
कन्या
महाअष्टमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी लाल वस्त्र परिधान करून देवी दुर्गेची पूजा करावी. याशिवाय कन्यापूजेच्या वेळी मुलींना गोड पदार्थ खाऊ घाला आणि दानासह फळे देऊन निरोप द्या.
तूळ
तूळ राशीच्या लोकांनी कन्या पूजेसाठी खीर बनवावी. असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि व्यवसायात नफा मिळतो अशी धार्मिक धारणा आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी भगवती देवीची विधिवत पूजा करावी. यासोबतच मुलींना सुक्या मेव्याचा प्रसाद खायला द्यावा.
धनु
धनु राशीचे लोक कन्या पूजेच्या वेळी मुलींना दही-जलेबी खायला देऊ शकतात, त्यांना स्टेशनरी वस्तू भेट देऊ शकतात. असे केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो आणि करिअरमध्ये यश मिळते असा विश्वास आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला देवीला लाडू अर्पण करावेत आणि मुलींना मालपुआ प्रसाद खाऊ घालावा. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते.
कुंभ
कुंभ राशीचे लोक कन्या पूजेच्या वेळी मुलींना खीर खाऊ शकतात आणि त्यांना निळ्या रंगाचे कपडे भेट देऊ शकतात. असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होते, अशी धार्मिक धारणा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Navratri 2023 : सुख, संपत्ती, ऐश्वर्याची देवी महागौरी! आजच्या पूजेने सुख-शांती लाभेल, पूजेची पद्धत, मुहूर्त, शुभ योग जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)