(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Relationship Tips : लोक घटस्फोट का घेतात? घटस्फोटामागील मुख्य कारण काय ? मोटिव्हेशनल स्पीकर सिस्टर शिवानी म्हणतात...
Relationship Tips : काही गोष्टींमुळे पती-पत्नीमधील हे घट्ट नातंही तुटते. अशात हे नातं तुटण्याचं कारण काय आहे? हे माणसाला समजत नाही.
Relationship Tips : नात्याचा धागा अत्यंत नाजूक असतो. एखादं नातं (Relation) बनवायला जितका वेळ लागत नाही, तितका वेळ ते टिकवून ठेवण्यासाठी लागतो. नातं तयार व्हायला वर्षं लागतात पण ते तुटायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे प्रत्येक नाते चांगले जपले पाहिजे. काही नाती हृदयाच्या इतकी जवळची असतात की आयुष्यभर एकत्र राहतात. पती-पत्नीचे नातंही असंच असतं, ज्यामध्ये वाद-विवाद होत राहतात आणि नाते घट्ट होते. पण काही गोष्टींमुळे पती-पत्नीमधील (Reason Of Divorce) हे घट्ट नातंही तुटते. अशात हे नातं तुटण्याचं कारण काय आहे? हे माणसाला समजत नाही. मोटिव्हेशनल स्पीकर सिस्टर शिवानी (Motivational Speaker Shivani) यांनी एका व्हिडिओमध्ये लग्न आणि घटस्फोटाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. तसेच घटस्फोट का होतात? यावर आपलं मत व्यक्त केलंय.
"मग तुम्ही या नात्यात का गुंतलात?"
मोटिव्हेशनल स्पीकर सिस्टर शिवानी यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की, लोक घटस्फोट का घेतात? घटस्फोटामागील कारण म्हणजे त्यांची एक छोटीशी चूक जी नंतर मोठी होऊन घटस्फोटाचे मुख्य कारण बनते. सिस्टर शिवानी पुढे म्हणतात, 'आजच्या काळात वेगळे (घटस्फोट) करू इच्छिणारे जोडपे भेटले, आणि त्यांना विचारले की घटस्फोट का होत आहे? तर 5-10 वर्षांपूर्वी आमच्या घरात हे किंवा असे घडते याचे ठोस कारण असायचे. पण आजकाल लोक काय बोलतात हे तुम्हाला माहीत आहे का? लोक म्हणतात 'काही नाही'. ते जोडपे पुढे म्हणतात की, मला या नात्यात काहीही मिळत नाही, म्हणून ते वेगळे होत आहेत. त्यामुळे आपण या नात्यात राहू नये, असे वाटते. जर तुम्ही विचार करत असाल की, मला काही मिळत नाही तर मी विभक्त होतोय, मग तुम्ही या नात्यात का गुंतलात?
"नेहमी देणारे व्हा, घेणारे नाही"
सिस्टर शिवानी पुढे म्हणतात, 'जर तुम्ही फक्त देण्यासाठी रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार नाही. म्हणून, नेहमी ठरवा की कोणत्याही नात्यात तुम्ही नेहमी देवाकडून घ्याल आणि इतरांना द्याल. कोणीतरी आपल्याला काहीतरी देईल या आशेने हात पसरून आपण कोणाच्याही समोर जाणार नाही. असे होत नाही, तरच लग्नाची सुरुवातीची काही वर्षे नातं चांगले राहते आणि नंतर जसजसा वेळ जातो तसतसं समोरच्याकडून काही मिळत नाही असे वाटू लागते. म्हणून, नेहमी देणारे व्हा, घेणारे नाही.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>