एक्स्प्लोर

Rakshabandhan 2024: यंदा रक्षाबंधनाला तुमच्या भावंडांना द्या झकास गिफ्ट! या 5 सर्वोत्तम इलेक्ट्रीक स्कूटर्सचा पर्याय

खाली ५ सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्‍कूटर्सची माहिती देण्‍यात आली आहे, ज्‍या तुम्‍ही यंदाचा रक्षाबंधन सण संस्‍मरणीय व अर्थपूर्ण करण्‍यासाठी गिफ्ट म्‍हणून देऊ शकता. 

Rakshabandhan Gift Ideas: बहीण भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. एव्हाना घरोघरी बहिण भावांमध्ये काय गिफ्ट देणार, मोठं गिफ्ट हवं अशी लटकी भांडणंही सुरु झालेली दिसतात. अआपल्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी ही पाच भन्नाट गिफ्ट्स तुम्ही देऊ शकता. व्‍यावहारिकता व आधुनिकतेचा संयोग साधत तुमच्या भावंडांना उपयोगी गिफ्ट देत हा सण साजरा करण्‍यासारखा दुसरा आनंद नाही. इलेक्ट्रिक स्‍कूटर्स त्‍यांचे इको-फ्रेण्‍डली फायदे आणि आजच्‍या शहरी प्रवासामधील सोयीसुविधांमुळे लोकप्रिय पर्याय बनल्‍या आहेत. 

यंदा रक्षाबंधनला, इलेक्ट्रिक स्‍कूटर भेट देत तुमच्‍या भावंडांना सरप्राइज द्या, जी त्‍यांच्‍या दैनंदिन प्रवासामध्‍ये उत्‍साहाची भर करण्‍यासोबत शाश्‍वत राहणीमानाची देखील खात्री देते. आकर्षक व स्‍टायलिश डिझाइन्‍सपासून उच्‍चस्‍तरीय कार्यक्षमता व अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्यांपर्यंत या इलेक्ट्रिक स्‍कूटर्स तुमच्‍या भावंडांचा प्रवास अधिक आनंददायी व कार्यक्षम करण्‍यासाठी परिपूर्ण आहेत.  खाली ५ सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्‍कूटर्सची माहिती देण्‍यात आली आहे, ज्‍या तुम्‍ही यंदाचा रक्षाबंधन सण संस्‍मरणीय व अर्थपूर्ण करण्‍यासाठी गिफ्ट म्‍हणून देऊ शकता. 

कायनेटिक ग्रीन झूम 

किंमत - ७१,५३१ रूपये 

कायनेटिक ग्रीन झूम ही शहरी व काही अंतरापर्यंतच्‍या प्रवासासाठी डिझाइन करण्‍यात आलेली इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे, जी व्‍यावहारिक व इको-फ्रेण्‍डली परिवहन सोल्‍यूशन देते. या स्‍कूटरमध्‍ये २५० वॅट बीएलडीसी मोटरची शक्‍ती आहे, स्‍कूटरची अव्‍वल गती २५ किमी/तास आहे. या स्‍कूटरमध्‍ये ४८ व्‍होल्‍ट / २४ एएच लिथियम-आयन बॅटरी आहे, जी संपूर्ण चार्ज असल्‍यास जवळपास ६० ते ७० किमीची रेंज देते आणि संपूर्ण चार्ज होण्‍यास जवळपास ४ ते ५ तास लागतात. या स्‍कूटरमध्‍ये गती व बॅटरी स्थितीवर देखरेख ठेवण्‍यासाठी डिजिटल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर आणि सुस्‍पष्‍ट दृश्‍यमानतेसाठी एलईडी हेडलॅम्‍प आहे. विश्वासार्ह स्‍टॉपिंग पॉवरसाठी या स्‍कूटरच्‍या फ्रण्‍ट व रिअर व्‍हील्‍समध्‍ये ड्रम ब्रेक्‍स आहेत, तसेच आरामदायी सस्‍पेंशन सिस्‍टमसह टेलिस्‍कोपिक फ्रण्‍ट सस्‍पेंशन आणि ड्युअल स्प्रिंग रिअर सस्‍पेंशन आहे. अतिरिक्‍त सोयीसुविधांमध्‍ये सुलभ चार्जिंगसाठी रिमूव्‍हेबल बॅटरी आणि सुधारित सुरक्षिततेसाठी कीलेस एण्‍ट्री सिस्‍टम आहे. जवळपास ६० किग्रॅ वजन आणि १०-इंच ट्यूबलेस टायर्स असलेली कायनेटिक ग्रीन झूममध्‍ये कार्यक्षमता व आरामदायीपणाचे उत्तम मिश्रण आहे, ज्‍यामुळे शहरातील प्रवासासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.  

ओडीसी स्‍नॅप

किंमत - ७९,९९९ रूपये 

ओडीसी स्‍नॅप किफायतशीर इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली १२०० वॅट मोटर आणि २००० वॅटची सर्वोच्‍च शक्‍ती आहे, तसेच स्‍कूटरची अव्‍वल गती ६० किमी/तास आहे. स्‍नॅप इकॉनॉमिक मोडमध्‍ये जवळपास १०५ किमीची प्रभावी रेंज देते, ज्‍यामुळे दैनंदिन प्रवासासाठी ही परिपूर्ण आहे. या स्‍कूटरमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जसे पोर्टेबल लि-आयन बॅटरी, कीलेस एण्‍ट्री आणि जलद ४-तास चार्जिंग वेळ. सुरक्षिततेसाठी, स्‍कूटरमध्‍ये फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेक्‍स आणि शक्तिशाली सस्‍पेंशन सिस्‍टम आहे. ओडीसी स्‍नॅप अझुरे ब्‍ल्‍यू, मॅट ब्‍लॅक, स्‍कार्लेट रेड, टील ग्रीन या चार आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. फ्लिपकार्टच्‍या माध्‍यमातून बुक केल्‍यास जवळपास १०,००० रूपयांची सूट देखील मिळू शकते. 

हिरो इलेक्ट्रिक एट्रिया एलएक्‍स 

किंमत: ७७,६९० रूपये

हिरो इलेक्ट्रिक एट्रिया एलएक्‍स शहरी प्रवासासाठी डिझाइन करण्‍यात आलेली व्‍यावहारिक व किफायतशीर इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये २५० वॅट बीएलडीसी मोटर आहे, अव्‍वल गती २५ किमी/तास आहे, ज्‍यामुळे शहरातील प्रवासासाठी ही स्‍कूटर अनुकूल आहे. या स्‍कूटरमध्‍ये ५१.२ व्‍होल्‍ट / ३० एएच लिथियम-आयन बॅटरीची शक्‍ती आहे, तसेच संपूर्ण चार्जमध्‍ये जवळपास ८५ किमीची रेंज देते आणि चार्जिंग वेळ जवळपास ४ ते ५ तास आहे. प्रमुख वैशिष्‍ट्ये आहेत गती व बॅटरी लेव्हल यासारखी महत्त्वाची माहिती दिसण्‍यासाठी डिजिटल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर आणि सुस्‍पष्‍ट दृश्‍यमानतेसाठी एलईडी हेडलॅम्‍प. एट्रिया एलएक्‍सच्‍या फ्रण्‍ट व रिअर व्‍हील्‍समध्‍ये ड्रम ब्रेक्‍स आहेत, ज्‍यामधून विश्‍वासार्ह ब्रेकिंग कार्यक्षमतेची खात्री मिळते. ही स्‍कूटर वजनाने हलकी आहे आणि पोर्टेबल बॅटरीसह येते, जी घरी किंवा ऑफिसमध्‍ये सोईस्‍करपणे चार्ज करता येऊ शकते. हिरो इलेक्ट्रिक एट्रिया एलएक्‍समध्‍ये किफायतशीरपणा व कार्यक्षमतेचे उत्तम संयोजन आहे, ज्‍यामुळे इको-फ्रेण्‍डली शहरी प्रवासासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

ओडीसी ई२गो लाइट 

किंमत: ७१,१०० रूपये

ओडीसी ई२गो लाइट भारतातील शहरी प्रवासासाठी डिझाइन करण्‍यात आलेली किफायतशीर इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरची किंमत ७१,१०० रूपये आहे. या स्‍कूटरमध्‍ये २५० वॅट बीएलडीसी मोटर आणि १.४२ केडब्‍ल्‍यूएच लिथियम-आयन बॅटरी आहे, तसेच स्‍कूटर सिंगल चार्जमध्‍ये जवळपास ७० किमीची रेंज देते. या स्‍कूटरची अव्‍वल गती २५ किमी/तास आहे, ज्‍यामुळे शहरातील राइड्ससाठी उत्तम निवड आहे, जेथे लायसेन्‍स किंवा नोंदणीची गरज भासत नाही. वजनाने हलकी डिझाइन व कॉम्‍पॅक्‍ट रचनेसह ई२गो लाइट वाहतूकीमध्‍ये सहजपणे चालवता येते. या स्‍कूटरमध्‍ये कीलेस एण्‍ट्री, अॅण्‍टी-थेफ्ट अलार्म आणि अतिरिक्‍त सुरक्षिततेसाठी फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेक्‍स आहेत. ही स्‍कूटर कॉम्‍बॅट रेड, अझुरे ब्‍ल्‍यू, मॅटे ब्‍लॅक, स्‍कार्लेट रेड, टील ग्रीन या ५ स्‍टायलिश रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. ई२गो लाइट विनासायास व इको-फ्रेण्‍डली प्रवासाची खात्री देते. फ्लिपकार्टच्‍या माध्‍यमातून बुक केल्‍यास जवळपास १०,००० रूपयांची* सूट देखील मिळू शकते. 

ओला एस१ एक्‍स 

किंमत - ८४,९९९ रूपये

एस१ एक्‍स ही शहरी प्रवाशांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली किफायशीर इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरची डिझाइन आकर्षक व आधुनिक आहे, ज्‍यामुळे समकालीन पेट्रोल स्‍कूटर्ससाठी व्‍यावहारिक व इको-फ्रेण्‍डली पर्याय आहे. किफायतशीरपणावर लक्ष केंद्रित करत एस१ एक्‍समध्‍ये आवश्‍यक वैशिष्‍ट्ये आहेत, जसे डिजिटल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, कीलेस एण्‍ट्री आणि विविध राइड मोड्स. शक्तिशाली २७०० वॅट मोटरची क्षमता असलेली ही स्‍कूटर उत्‍साहपूर्ण व कार्यक्षम राइडचा आनंद देते. स्‍कूटर तीन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे: २ केडब्‍ल्‍यूएच मॉडेल, जे ८५ किमी/तास अव्‍वल गती, १२१ किमीची रेंज देते आणि किंमत ९०,०१९ रूपये आहे; ३ केडब्‍ल्‍यूएच मॉडेल, जे १५१ किमीची रेंज आणि ९० किमी/तास अव्‍वल गती देते. बॅटरी ७.४ तासांमध्‍ये पूर्ण चार्ज होऊ शकते आणि सर्व मॉडेल्‍समध्‍ये अधिक सुरक्षिततेसाठी कम्बाइन्‍ड ब्रेकिंग सिस्‍टम (सीबीएस) आहे. ७ आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेली ओला एस१ एक्‍समध्‍ये स्‍टाइल, कार्यक्षमता व मूल्‍याचे संयोजन आहे, ज्‍यामुळे शहरातील दैनंदिन प्रवासासाठी ही योग्‍य निवड आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, संयाची शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, संयाची शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा

व्हिडीओ

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, संयाची शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, संयाची शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Embed widget