Purest Thing to Eat : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी अनेकजण आहारावर नियंत्रण ठेवतात. जंक फूड, तेलकट पदार्थांऐवजी भाज्या, फळं, मांस, दूध यांसारख्या हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करतात. अनेकजण तर ऑर्गेनिक आणि वेगन पदार्थांचा आहारात समावेश करतात. पण कधी तुम्ही विचार केलाय का? या पृथ्वीवर खाण्याचा किंवा आहारातील सर्वात शुद्ध पदार्थ काय? अनेकांना वाटतं की, फळं आणि भाज्या सर्वात शुद्ध आहेत. पण तुम्ही चुकताय. पृथ्वीवरील सर्वात शुद्ध पदार्थाचा भारतातील प्रत्येक घरात आहारात समावेश केला जातो. तुम्हाला माहीत आहे का? 


भारतीय खाद्यसंस्कृतीचं वेगळं महत्त्व आहे. संपूर्ण जगभरात भारतीय खाद्यपदार्थ त्यांच्या नाविण्यपूर्ण वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. अशातच पृथ्वीवरील सर्वात शुद्ध पदार्थाचा वापर भारतात प्रत्येक घरात केला जातो. हा शुद्ध पदार्थ म्हणजे, तूप (Ghee). 




पृथ्वीवरील सर्वात शुद्ध आहार म्हणजे, तूप


बीबीसीच्या एका अहवालानुसार, पृथ्वीवरील सर्वात शुद्ध आहार तूप आहे. काहीजण तूपाचा आहारात समावेश करणं टाळतात. पण हजारो वर्षांपासून तूपाचा समावेश आहारात केला जातो. पण तुपातील सॅच्युरेटेड फॅट हे आरोग्यासाठी चांगले नाही, असा समज काही दशकांपासून होता. पण आता सॅच्युरेटेड फॅटबद्दल लोकांची विचारसरणी बदलली असल्यानं भारतीयांच्या ताटात तूप पुन्हा जागा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


कोरोना काळात वाढला वापर 


कोरोना काळात आहाराचं महत्त्व फार वाढलं. सात्विक आहाराचं सेवन करणं लोकांनी सुरु केलं. खाण्यापिण्याच्या बाबतील अनेक लोक जागरुक झाले. अशातच लोकांनी तूपाचा समावेश आहारात करण्यास सुरुवात केली. तूप बाजारात सहज उपलब्ध होतं. एवढंच नाहीतर तूप तुम्ही घरच्या घरीही अगदी सहज तयार करु शकता. 




मागणी 25 ते 30 टक्क्यांनी वाढली


भारतात तुपाचं उत्पादन सातत्यानं वाढत आहे. अहवालानुसार, कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर तुपाची मागणी 25 ते 30 टक्क्यांनी वाढली आहे. तुपाचा संबंध केवळ आरोग्याशीच नाही तर पूजेसाठीही केला जातो. म्हणजेच तुपाचा संबंध लोकांच्या श्रद्धेशीही आहे. पौराणिक कथेनुसार, वैदिक देवता प्रजापती दक्ष यांनी प्रथमच आपले दोन्ही हात चोळून तूप तयार केलं. हे तूप अग्नीत टाकून त्यांनी आपली मुलं घडवली. तेव्हापासून वेद-पुराणांतही तूपाला महत्त्व आहे. एवढंच नाहीतर, आयुर्वेदातही तुपाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. 


तुपाचा संबंध श्रद्धेशीही 


याशिवाय तुपाचा भारतीय संस्कृतीशीही खोलवर संबंध आहे. विवाहापासून ते पुजाअर्चा करताना सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी हवनाच्या अग्नीत तूप अर्पण केलं जातं. तूप शुभ मानलं जातं. याशिवाय आयुर्वेदात तूप अनेक व्याधींवरील रामबाण औषध असल्याचं मानलं गेलं आहे. तुपातील पौष्टिक गुणधर्मांमुळे बहुतेक घरांमध्ये त्याचा वापर केला जातो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :