Eye Care Tips : हसणं... आनंदी राहणं आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असतं असं आपण नेहमी ऐकतो. तणाव, नैराश्य दूर करण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे, आनंदी राहणं. पण तुम्हाला माहितीये का? हसण्याचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच फायदे रडण्याचेही (Benefits of Tears) आहेत. मग तुम्हा एखादी मालिका किंवा चित्रपट पाहून भावूक होणं असो किंवा मग कांदा कापताना तुमच्या डोळ्यांत आलेलं पाणी असो. 


रिसर्चनुसार, आपल्या डोळ्यांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी अश्रू खूप महत्वाचे आहेत. यामुळे तुमचे डोळे ओलसरपणा म्हणजेच, हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे डोळ्यांना होणारं इन्फेक्शन आणि डोळ्यांत जाणारी वातावरणातील धूळीपासून संरक्षण होतं. डोळ्यांतील अश्रूंमुळे डोळ्यांतील घाण निघून जाते आणि डोळे स्वच्छ राहतात. त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं. जाणून घेऊया... 



डोळ्यांत अश्रू का येतात? 


माणूस भावूक होतो, तो रडतो. यामागील कारण पूर्णपणे वैज्ञानिक आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर, जेव्हा आपण इमोशनल (Emotional) होतो,  कांदा कापताना, डोळ्यांत धूळ गेल्यामुळे किंवा तिखट पदार्थांमुळे अश्रू येतात. डोळ्यांतून येणारं पाणी डोळ्यांतील अश्रू नलिकांमधून बाहेर पडणारा द्रव, जो पाणी आणि मीठ यांच्या मिश्रणानं तयार होतो. यामध्ये Oils, Mucus आणि Enzymes नावाची केमिकल्स असतात. यामुळे डोळ्यांत धुळीमुळे गेलेले जंतू नष्ट होतात. परिणामी डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं आणि डोळे निरोगी राहतात. 


अश्रूंचेही असतात तीन प्रकार... 


आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल की, डोळ्यातील अश्रूंचेही तीन प्रकार असतात. जाणून घेऊयात कोणते... 



  • Basal Tears : हे अश्रू डोळ्यांची उघडझाप करताना तरळतात. हे डोळ्यांमध्ये ओलावा राखण्याचं काम करतात. हे अश्रू ये नॉन-इमोशनल असतात. 

  • Reflex Tears : हे अश्रूही नॉन-इमोशनल असतात. हे डोळ्यांत हवा, धूळ किंवा कचरा गेल्यामुळे येतात. 

  • Emotional Tears : दुःख, नैराश्य यांमुळे डोळ्यांत अश्रू येतात. म्हणजेच, हे अश्रू भावूक झाल्यामुळे येतात. 


अश्रूंचेही असतात फायदे... 


नेदरलँडमधील एका अभ्यासानुसार, रडल्यानं अनेकदा आराम मिळतो आणि त्यामुळे मनावरचं ओझं दूर होतं. 
अश्रूंमध्ये लायसोझाइम (Iysozyme) नावाचा द्रव पदार्थ आढळतो. ज्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. हे आपल्या डोळ्यांना संसर्गापासून वाचवतं आणि डोळे स्वच्छ ठेवण्यास मदत करतं.
रडल्यामुळे भावनांवर नियंत्रण राहतं आणि मानसिक तणाव दूर होतो. 
रडण्यानं शरीरात ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, जे शारीरिक वेदना आणि भावनिक वेदनांपासून आराम मिळतो. 
अश्रू तरळल्यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत आणि त्यांचा ओलावा कायम राहतो, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Health Benefits of Pani Puri : टेस्टी टेस्टी पाणीपुरी, असते हेल्दी; वेट लॉस, अॅसिडिटीसह अनेक समस्या होतील झटपट दूर