11th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण महिना आणि विविध सणवार हे जणू समीकरणच. आज 11 ऑगस्ट म्हणजेच भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन. त्याचबरोबर कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा सण देखील आज आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 11 ऑगस्ट दिनविशेष.
11 ऑगस्ट : नारळी पौर्णिमा.
श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.
11 ऑगस्ट : रक्षाबंधन.
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ मूळ उत्तरी भारतातला हा सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो.
बृहस्पती पूजन :
श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते.
1961 : साली दादरा आणि नगर हवेली हा भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला.
दादरा आणि नगर हवेली हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या उत्तरेला गुजरात राज्य तर इतर तिन्ही दिशांना महाराष्ट्र राज्य आहे. 2011 च्या जनगणनेनुसार दादरा आणि नगर हवेलीची लोकसंख्या 3,42,853 एवढी आहे तर क्षेत्रफळ 491 चौ. किमी आहे.
इ.स. 1877 साली अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल (Herbert Hall Turner) यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.
1908 : साली क्रांतिकारक खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली.
देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांपैकी पहिले नाव येते ते खुदीराम बोस यांचे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते शहीद झाले.
1949 : साली भारतीय अर्थशास्त्रज्ञ, सेंट्रल बँकर आणि निवृत्त आयएएस अधिकारी तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकचे माजी 22 वे गव्हर्नर दुव्वरी सुब्बाराव यांचा जन्मदिन.
1970 : साली भारतीय महाराष्ट्रीयन मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :