Health Tips : दिवसाची सुरुवात करा हेल्थी; 'या' पदार्थांनी वाढवा शरीरीतील प्रोटीनचे प्रमाण
Protein Rich Breakfast : सकाळची सुरुवात हेल्दी खाण्याने झाली तर शरीर तंदुरुस्त राहते. या प्रथिनयुक्त पदार्थांना तुम्ही तुमच्या आहाराचा भाग देखील बनवू शकता
High Protein Breakfast : सकाळचा नाश्ता (Breakfast) हा सर्वात महत्वाचा आहार आहे. सकाळच्या नाश्त्यामुळे दिवसभरासाठी शरीराला ऊर्जा मिळते आणि त्यामुळे थकवा जाणवत नाही. मात्र, जर तुमचा नाश्ता योग्य नसेल तर थोड्याच वेळात तुम्हाला भूक लागते आणि ऊर्जाही मिळत नाही. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सकाळच्या नाश्त्यात प्रथिनेयुक्त (Protein) पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रथिनेयुक्त अन्न खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि चरबी कमी करण्याकरता याचा मोठा फायदा शरीराला होतो. प्रथिनांमुळे स्नायूंचे नुकसान होत नाही, चयापचय व्यवस्थित होते. जाणून घ्या असे कोणते भारतीय पदार्थ आहेत ज्याचा आपल्या शरीराकरता मोठा फायदा होऊ शकतो.
मूग डाळ धिरडं
मूग डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. मूग डाळ धिरडं ज्याला पोळा किंवा चिला असंही म्हणतात. यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये कॅलरीज कमी असून हे वजन कमी करण्यास मदत करते. बेसनापेक्षा मूग डाळीचं धिरडं जास्त फायदेशीर आहे आणि बेसनापेक्षा पचायलाही हलकाही आहे.
लापशी
लापशीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात, ज्याच्या शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. हे खाल्ल्यानंतर वारंवार भूक लागत नाही आणि त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते.
पोहे
पोहे हा असा एक नाश्ता आहे, जो भारतात आवडीने खाल्ला जातो. नाश्त्यामध्ये पोहे खाल्ल्यास दिवसभराच्या कामांसाठी तुम्हाला भरपूर एनर्जी मिळते. पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. पोहे खाल्ल्याने कधीच वजन वाढत नाही, कारण एक वाटी पोह्यामध्ये कमीत-कमी 250 कॅलरीज असतात.
उपमा
रवा आणि भाज्यांनी बनवलेला उपमा पचायला सोपा असतो. हा एक हलका प्रोटीनयुक्त नाश्ता आहे, यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जर तुम्ही नाश्त्यासाठी उपमा बनवत असाल तर हा पदार्थ काही मिनिटांतच तयार होतो. तसेच लहान मुले आणि प्रौढ दोघेही उपमा खाण्याचा आनंद घेऊ शकतात.
रवा ढोकळा
रवा ढोकळा ही एक अत्यंत सोपी आणि साधा पदार्थ आहे. हा पदार्थ बनवायला खूपच कमी वेळ लागतो मात्र, याचे शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. रवा ढोकळा बनवताना त्यात पाण्याऐवजी दही किंवा ताक वापरावे. रव्यात कार्बोहायड्रेट्स अधिक असतात तर, ताकात प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते.
ओट्स इडली
आपल्या दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी तांदूळ किंवा रव्याऐवजी ओट्स वापरुन गरमागरम इडली बनवू शकता. ओट्समध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ही इडली सांबार आणि नारळाच्या चटणीसह सर्व्ह करू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या :
तुम्हीही घाईघाईत जेवून आजारांना आमंत्रण देताय का? नुकसान जाणून घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )