Parenting Tips : 'हे' पदार्थ चुकूनही मुलांच्या टिफिनमध्ये पॅक करू नका; चवीमुळे तब्येतीवर होऊ शकतो वाईट परिणाम
Parenting Tips : मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे.
Parenting Tips : आपल्या निरोगी शरीरासाठी आहार (Food) महत्त्वाची भूमिका बजावतो. लहान मूल असो किंवा प्रौढ व्यक्ती प्रत्येकासाठी निरोगी आहार गरजेचा आहे. मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये आढळणारी आवश्यक पोषकतत्त्वे मुलांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असतात, परंतु मुले फास्ट फूड आणि गोड पदार्थ मोठ्या उत्साहाने खातात. अशा वेळी तुम्ही आपल्या मुलांच्या टिफिनमध्ये फक्त त्यांच्या आवडते खाद्यपदार्थ ठेवतात. जेणेकरून मुलांना ते सहज खाता येईल. पण हे पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात, टिफिनमध्ये मुलांना काय देऊ नये?
स्वीट ड्रिंक्स
मुलांना स्वीट ड्रिंक्स फार आवडतात. पण, ते जास्त खाल्ल्याने वजन वाढणे, दात किडणे आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही तुमच्या मुलाला टिफिनमध्ये सोडा, फळांचा रस आणि स्पोर्ट्स ड्रिंक्स दिले तर त्यामुळे तुमच्या मुलाचं आरोग्य बिघडू शकतं.
तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ प्रत्येकासाठी नुकसानकारक असतात. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या टिफिनमध्ये तळलेले पदार्थ अनेकदा पॅक करत असाल तर त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ
मुलांना चिप्स, कुकीज किंवा इतर प्रक्रिया केलेले पदार्थ आवडतात, परंतु त्यात कोणतेही पोषक घटक नसतात. या पदार्थांमध्ये सोडियम आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो, त्यामुळे मुलांच्या जेवणाच्या डब्यात ताजी फळे, भाज्या किंवा घरगुती स्नॅक्स ठेवा.
फास्ट फूड
जर तुम्ही तुमच्या मुलाला बर्गर, पिझ्झा, नूडल्ससारखे फास्ट फूड खाऊ घालत असाल तर त्यामुळे तो लवकर आजारी पडू शकतो. फास्ट फूडमध्ये अनहेल्दी फॅट्स, सोडियम आणि साखर जास्त प्रमाणात असते.
आर्टिफिशियल फूड कलर
आर्टिफिशियल फूड कलर अन्नाला रंग देण्याचे काम करतात, परंतु ते आरोग्यास कोणताही फायदा देत नाहीत, उलट ते फक्त नुकसान करतात. त्याच्या अतिवापराने अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो, त्यामुळे मुलांच्या जेवणात आर्टिफिशियल फूड कलर वापरणे टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :