एक्स्प्लोर

Oral Cancer: तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा

Early symptoms of oral cancer: वेळीच निदान झाल्यास मौखिक कर्करोग पूर्णपणे बरा होतो; सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला.

Oral cancer prevention tips: सध्या मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये (Oral Cancer) लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र, या आजाराचे वेळीच निदान (Health Tips) न झाल्यास तो यशस्वीपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं ओळखणे आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता वाढते.

मौखिक कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार करता येतात. परंतु अनेकदा या आजाराची सुरुवातीची लक्षणे वेदनारहित किंवा किरकोळ वाटत असल्याने रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या कर्करोगाचा प्रसार होऊन उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात आणि रुग्णाच्या जीवनमानावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक आहे.

मुखाच्या कर्करोगाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती? (Warning signs of mouth cancer)

तोंडामध्ये दोन आठवड्यांहून अधिक काळ न भरून येणारी जखम किंवा अल्सर, तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे दिसणे, गालाच्या आतील बाजूस गाठ किंवा जाडी वाढल्यासारखे जाणवणे, सतत वेदना होणे, चावण्यास किंवा गिळण्यास त्रास होणे, दात सैल होणे, तोंडात बधिरपणा जाणवणे किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना रक्तस्राव होणे ही मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. आवाजात बदल होणे, सतत घसा दुखणे किंवा मानेवर सूज अथवा गाठ जाणवणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

धूम्रपान करणे, तंबाखू, गुटखा किंवा पानमसाला चघळणे, नियमित मद्यपान करणे आणि मौखिक स्वच्छता न राखणे यामुळे मुखाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. मात्र,  व्यसन न करणाऱ्या व्यक्तींनाही मौखिक कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मौखिक आरोग्याकडे नियमित लक्ष देणे गरजेचे आहे.

मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सर्व प्रकारचे तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळणे, मद्यपानावर नियंत्रण ठेवणे, मौखिक स्वच्छता राखणे, आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे तसेच नियमितपणे दंतवैद्यांकडून मौखिक आरोग्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. याशिवाय दर महिन्याला स्वतः मौखिक आरोग्याची तपासणी करण्याची सवय लावावी. तोंडात न भरून येणाऱ्या जखमा, लाल किंवा पांढरे चट्टे अथवा इतर कोणतीही असामान्य लक्षणं आढळल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण मौखिक कर्करोगाचे सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास यशस्वी उपचार करतात येतात आणि रुग्ण चांगले आयुष्य जगू शकतो.

डॉ. अमित चक्रवर्ती, हेड अँड नेक ऑन्को सर्जन, एसएसओ हॉस्पिटल, मुंबई

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'लेकीसाठी मराठीच शाळा हवी...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, दादरमध्ये मराठमोळं रेस्टॉरंटही सुरू केलं, सांगितला किस्सा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
Embed widget