Omicron Variant Alert : सावधान! लस घेतलेल्या लोकांमध्ये 'ही' ओमायक्रॉनची लक्षणे दिसतात, जाणून घ्या...
Health News : ओमायक्रॉन या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरियंटमुळे देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, लसीकरण केलेल्या लोकांमध्येसुद्धा ओमायक्रॉनची लक्षणे दिसतात.
Covid-19 : भारतातच नव्हे तर जगभरात कोरोनाचे जाळे पसरले आहे. या कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी लस हा एकमेव उपाय आहे असे, तज्ञ सांगतात. लस ही केवळ गंभीर संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करत नाही. तर, रुग्णालयात दाखल होण्याचा आणि संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोका देखील कमी करते. आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनने देशात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे, ही लस प्रभावी ठरते का? याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, लसीकरण केलेल्या लोकांमध्ये ओमायक्रॉनची लक्षणे दिसतात. ती कशी? ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लस घेतल्यानंतरही Omicron चा संसर्ग होऊ शकतो का?
कोविड-19 चा हा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन लसीपासून प्रतिकारशक्ती कमी करण्यास सक्षम आहे. म्हणजेच, लस दिल्यानंतरही तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. परंतु ही लस ओमायक्रॉनचा धोका कमी करण्यासाठी कार्य करते. ज्यांचे अजूनही लसीकरण झालेले नाही, त्यांना या विषाणूची लागण होण्याचा धोका जास्त वाढतो. त्याच वेळी, लसीकरण झालेल्या लोकांमध्ये या संसर्गाची सौम्य लक्षणे दिसू शकतात.
लस घेतल्यानंतर या लक्षणांवर लक्ष ठेवा
Omicron हा व्हेरियंट डेल्टा प्रकारापेक्षा कमी हलका आहे. ओमायक्रॉनने संक्रमित रूग्णांमध्ये सर्दीसारखी लक्षणे दिसतात आणि ती लवकरही बरी होते. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना कोविड-19 चे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्यांना घसा खवखवणे होऊ शकते. ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. Omicron लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. घसा खवखवण्यासोबतच थकवा, ताप, अंगदुखी, रात्री घाम येणे, शिंका येणे, नाक वाहणे अशी लक्षणे दिसत असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण ही Omicron ची लक्षणे असू शकतात . अशा वेळी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care Tips : सर्दीसोबतच कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करायचाय? मग, आहारात ‘हे’ सुपरफूड नक्की सामील करा!
- CoWin Portal News : कोविन पोर्टलवरून डेटा लीक? आरोग्य मंत्रालयाकडून महत्वाची माहिती... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय..
- Coronavirus : कोरोनातून बरे झाल्यावर बदला 'या' गोष्टी, पुन्हा संसर्ग होण्यापासून होईल बचाव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )