Weight Loss Tips: बहुतेक लोक वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी डायटिंग करतात, म्हणजेच खाणेपिणे कमी करतात. वजन कमी करण्याच्या नादात अनेकजण चपाती खाणेही सोडून देतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी हा पर्याय अतिशय चुकीचा आहे. असे केल्याने तुम्हाला लवकर थकवा जाणवू शकतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही चपातीही खाऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला योग्य पीठ निवडावे लागेल.


आता वजन कमी करण्यासाठी गव्हाची चपाती खावी की, मल्टीग्रेन रोटी खावी? यापैकी कोणती जास्त फायदेशीर ठरेल, असा विचार अनेकांच्या मनात येतो. तुम्ही देखील याच संभ्रमात असाल, तर जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण, आज आम्ही तुम्हाला या दोन्ही पिठांमधील फरक सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.


मल्टीग्रेन रोटी (Multi Grain)


मल्टीग्रेन रोटी म्हणजे एक अशी चपाती, जी अनेक प्रकारच्या धान्यांनी बनलेली असते. त्यात ओट्स, गहू, बाजरी, कॉर्न, ज्वारी, हरभरा इत्याही तृणधान्यांपैकी 3 ते 5 प्रकारचे धान्य समाविष्ट केलेले असते. यापेक्षा अधिक धान्याचे पीठ देखील बाजारात उपलब्ध आहे. मल्टीग्रेन पिठात जास्त फायबर असते, जे वजन कमी करणाऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरते.


मल्टीग्रेन रोटीचे फायदे :


* मल्टीग्रेन पिठापासून बनवलेल्या रोट्या खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात. गव्हाच्या पिठात जर सोयाबीन, हरभरा आणि बार्ली मिसळले, तर ती चपाती प्रथिनांचा चांगला स्रोत बनते. मुलांच्या विकासातही याचा फायदा होतो.


* मल्टीग्रेन पिठाच्या चपात्या खाल्ल्याने पचनसंस्थाही व्यवस्थित राहते.


गव्हाची चपाती (Wheat)


गव्हाचे पीठ फक्त संपूर्ण गहू दळून तयार केले जाते. यातील कोंड्यामुळे पिठाची पौष्टिकता वाढते. गव्हात व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, फायबर्स आणि मिनरल्स असतात.  


गव्हाची चपाती खाण्याचे फायदे :


* गव्हाची चपाती मधुमेही, हृदयरोगींसाठी फायदेशीर आहेत.


* गव्हाची चपाती नियमित खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो.


गव्हाची चपाती की मल्टीग्रेन रोटी?


ही दोन्ही पीठं समप्रमाणात पौष्टिक आहेत. मात्र, केवळ वजन कमी करण्यासाठी मल्टीग्रेन रोटी गव्हाच्या चपातीच्या तुलनेत लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरली असती. म्हणूनच वजन कामी करायचे असेल, तर तुम्ही मल्टीग्रेन चपातीचे सेवन करू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha