Vegetable And Fruits For Weight Loss:  जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवा. वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अनियमित जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, ताणतणाव आणि इतर आजार वाढतात. अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आहाराचे नियोजन करावे.


वजन कमी करायचे असेल तर, आहारातून कार्बोहायड्रेट्स आणि साखर ताबडतोब कमी करावी. तसेच आहारातील बटाटे, भात यांचे प्रमाण देखील कमी करा. या गोष्टींमुळे वजन झपाट्याने वाढते. जर, तुम्ही जास्त फास्ट फूड आणि स्नॅक्स खात असाल तर ही सवय सोडा. वजन कमी करण्यासाठी, कमी कॅलरीयुक्त फळे आणि भाज्या आहारात समाविष्ट करा. यासाठी आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवा. या हिरव्या भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणत खा.


पालक-मेथी : पालक आणि मेथी अनेक आरोग्यदायी फायदे देतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. पालक खाल्ल्याने पोट चांगले राहते आणि फायबर मिळते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.


टरबूज : वजन कमी करण्यासाठी टरबूज हे सर्वात फायदेशीर फळ मानले जाते. टरबूज खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे वजनही सहज नियंत्रित राहते. टरबूजमध्ये कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदय, किडनी आणि डोळे निरोगी राहतात.


ब्रोकोली : वजन कमी करण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात नक्कीच समावेश करा. ब्रोकोली खाण्यास स्वादिष्ट आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, फायबर आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात. ब्रोकोलीच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.


केल : जेवणात हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. केल ही देखील अशीच एक हिरवी पालेभाजी आहे, जी तुमचा लठ्ठपणा दूर करण्यास मदत करते. इतर हिरव्या भाज्यांपेक्षा केलमध्ये जास्त पौष्टिक घटक आढळतात. ही भाजी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.


दुधी : वजन कमी करण्यासाठी दुधी देखील अतिशय पौष्टिक आहार आहे. दुधी पचायला खूप सोपा आहे आणि त्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. दुधीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर आढळतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha