Nana Patole Member of the Maharashtra Legislative Assembly : भाजपाकडून सतत महाविकास आघाडी सरकारला पर्यायने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरु केले आहे. हा प्रकार थांबला पाहिजे कारण, यामुळे केवळ मनोरंजन सुरु आहे. भाजपाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले असल्याच्या आरोप केला गेला, मात्र तिथे काहीच नव्हते.  त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करणाऱ्याच्या विरोध करायला पाहिजे, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. संजय राऊत यांच्या आरोपाची मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या तपास यंत्रणाकडून तपास करण्याची गरज असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.  विदर्भात शिवसेना संघटनात्मक बदल करत आहे. शिवसनेचे विदर्भात स्वागत, असेही पटोले म्हणाले.  स्वतंत्र लढल्यास शिवसेना विदर्भात काँग्रेसचा प्रबळ विरोधी ठरू शकतो का? यावर मिश्किल भाषेत हसत, विदर्भात शिवसेनेचे स्वागत असल्याचे नाना पटोले म्हणाले. 

Continues below advertisement

केंद्रात भाजपची सत्ता नकोशी झाल्यावर आम्ही सर्व एकत्र येत आघाडी तयार करत आहे. त्यासाठी माझे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी बोलणे झाले, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केले आहे. ममता बॅनर्जी देशात भाजपविरोधी आघाडी तयार करीत असताना आघाडीत काँग्रेसला सोबत घेण्याच्या विरोधात असून तसे प्रयत्न केले जात आहेत, या वक्तव्याचे नाना पटोले यांनी खंडण केले आहे. चंद्रशेखर राव यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. मी दौऱ्यावर असल्यामुळे भेट झाली नाही. त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत. आम्ही स्त्री शक्तीचा अपमान करणाऱ्या मनुवादी व्यवस्थेविरोधात एकत्र आल्याचे त्यांनी सांगीतले, असेही पटोले म्हणाले.  

महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर खालावला... नाना पटोलेमहाराष्ट्रातिल राजकारणाचा स्तर खालावला असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. भाजपाचा काळात हा स्तर खालावल्याचेही पटोले यांनी म्हटले. भाजपामुळे भष्ट्राचाराचा पायंड़ा पडला असून तपास यंत्रणेचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणे, यासारख्या गोष्टी भाजप करत आहे. त्यामुळेच राजकाराचा स्थर खालावला आहे.  महाराष्ट्राच्या राजकरणचा आदर्श इतर राज्य घेत होते, मात्र आता असे होताना दिसत नाही. पहाटे आलेली सरकार अल्प ठरल्याने ते भांबावले आहेतस, असे म्हणाले. 

Continues below advertisement

काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई अशक्य, यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य - यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर टीकास्त्र सोडलं आहे. यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे 'संघी' अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहतायत, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे.’ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसशिवाय मोदींचा पराभव करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : के. चंद्रशेखर राव यांचे भाजपाविरोधी आघाडीसाठीचे प्रयत्न स्वागतार्ह, पण.... : नाना पटोले