Monsoon fitness : पावसाळा नुकताच सुरू झाला असून त्याने दमदार हजेरी लावली आहे. अनेकदा पावसामुळे माॅर्निंग वाॅककरता घराबाहेर पडता येत नाही. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. याकरता नियमित माॅर्निंग वाॅक करणे गरजेचे आहे. यामुळे आरोग्य चांगले राहते तसेच अनेक आजार दूर होण्यास मदत होते. शरीराच्या हालचालीकरता चालणे हा अतिशय सोपा मार्ग आहे. निरोगी राहण्यासाठी लोक मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) जातात किंवा काही लोक संध्याकाळी वॉकला (Evening Walk) जातात. मात्र पावसाळ्यात अनेकदा आपल्याला चालण्यासाठी बाहेर पडता येत नाही अशा वेळी घरातल्या घरात देखील व्यायाम केला जाऊ शकतो. घरात व्यायाम करण्याकरता काय उपाय करावेत जाणून घेऊयात.


1 . तुम्ही रोजचे तुमचे काम करत असताना देखील तुमचा वाॅक होऊ शकतो. त्यासाठी घरातच टिव्ही शो पाहताना , गाणे ऐकत किंवा एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलत तुम्ही वाॅक करू शकता. 


2. तुम्ही काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत असाल तर घरातच गाणे लावून तुम्ही झुंबा (Zumba) करू शकता. तसेच स्किपिंग, जंपिंग जॅक आणि हॉपिंग यांसारख्या अॅक्टिवीटीज देखील तुम्हाला घरातल्या घरात करता येऊ शकतात. 


3. केवळ घरातल्या घरातच व्यायाम न करता तुम्ही तुमच्या घराजवळ असणाऱ्या बागेत , राहत्या अपार्टमेंटच्या खाली या ठिकाणीही चालण्यासाठी  जाऊ शकता. यामुळे पावसाळ्यात देखील तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.


4. घरात ट्रेडमिल असेल तर त्याचा वापर तुम्ही चालण्याकरता करू शकता.


5. तुमच्या घरातील लोकांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत तुम्ही बॅडमिंटन तसेच टेबल टेनिस असे शरीरास चालना देणारे गेम्स खेळू शकता.


6. रोजच्या दैनंदिनीत लिफ्टच्या वापर करणे टाळा. शक्यतो कोठेही बाहेर जाताना चालत जा. व्यायामाकरता पायऱ्यांचा वापर करा. जेणेकरून शरीराची हालचाल होईल आणि कोणताच आजार बळावणार नाही.


7. मॉर्निंग वॉक करताना थंड पाणी पिणे टाळा. चालताना जर तहान लागत असेल तर एक कोमट पाण्याची बाटलीसोबत ठेवा. कोमट पाणी प्यायल्यानं पचन क्रिया चांगली होते.


8. नियमित चालणे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलचे चांगले नियंत्रणात राहते. दिवसभर थोडे चालणे स्नायूंना सक्रिय बनवते. त्यामुळे ऋतू कोणताही असू निरोगी शरीराकरीता माॅर्निंग वाॅक घेणे खूप गरजेचे आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या